मुंबई: नव्या पिढीतील इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहासकार मानतच नाहीत. २००० नंतरच्या इतिहास संशोधकांच्या पिढीने बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहासकार म्हणून बाद ठरवले आहे. हे संशोधक पुरंदरे (babasaheb purandare) यांची एकही कादंबरी संदर्भ म्हणून वापरत नाहीत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले. ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाचा विषय का काढतात, ते मला माहिती नाही. पण राज ठाकरे हा विषय जितका उचलून धरतील, तितकेच ते अडचणीत येतील, असे आव्हाड यांनी म्हटले. इतिहास हा कादंबरीतून येऊ शकत नाही. कादंबरीकारांवर बोलून तुम्ही इतिहासाचे संदर्भ लावणार असाल ते आम्हाला अमान्य आहे. तसेच बाबासाहेब पुरंदरे हे साहित्यिक म्हणूनही थोर नव्हते. त्यांच्या एकाही कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार का मिळालेला नाही? एवढेच नव्हे तर लंडन किंवा अमेरिकेतील विद्यापीठांनी पुरंदरे यांना पीएचडी देखील दिली नाही. इतिहास संशोधनाला जगमान्यता मिळते. मग बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत तसे का घडले नाही, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
लोकमान्य टिळकांनी पैसे जमा केले पण शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केलाच नाही:आव्हाड
महाराष्ट्रात वा.सी. बेंद्रे, केळुस्कर, कमल गोखले यांच्यासारखे इतिहासतज्ज्ञ होऊन गेले असताना एकाच माणसाचं शंभरदा नाव घेऊन लोकांची माथी का भडकावली जात आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामुळे इतिहास हा खणायचा नसतो, त्यामधील चांगल्या गोष्टी घेऊन पुढे जायचे असते, असेही आव्हाड यांनी म्हटले.

‘… मग कुसुमाग्रजही ब्राह्मण होते?’

बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण असल्यामुळे त्यांना शरद पवारांचा विरोध होता, असे राज ठाकरे म्हणतात. मग कुसुमाग्रज हेदेखील ब्राह्मण होते. त्यांच्या नावावे दिला जाणारा सर्वांत मोठा पुरस्कार, तो कसा द्यावा, त्याचे निकष काय असावेत, याच्या सूचना कशा आहेत तर त्या पवारसाहेबांच्या. महाराष्ट्राचा इतिहासात सर्वांत जास्त वेळा संमेलनात हजेरी , उद्घाटक हे कोण होते, तर ते पवारसाहेब.. मग साहित्यिक वेडे होते, असं तुम्हाला म्हणायचंय का? साहित्यिक विकले गेले, असंही तुम्ही उद्या स्टेजवरुन म्हणाल.पवार सत्तेत कधी होते, सत्तेत नसताना साहित्यिकांनी किती वेळा पवारांना साहित्य संमेलनात गेले? इतिहासात लोकांनी ब्राह्मण्यवादाला विरोध केलाय, ब्राह्मणांना नाही, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here