मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर उद्या राज्यभरात होणाऱ्या महाआरतीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. यासंबंधी मनसेकडून अधिकृत घोषणा करण्यात आली असून राज ठाकरे यांनी याबद्दल एक ट्विटही शेअर केला आहे. ‘कोणीही उद्या महाआरती करू नका, पुढे काय करायचं ते मी सांगतो’, अशा शब्दात राज ठाकरेंकडून मनसैनिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

खरंतर, मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीतर मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये हनुमान चालीसा लावून महाआरती करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. पण उद्या रमजान ईद (Ramadan Eid 2022) आहे. कोणाच्याही सणात आपल्याला बाधा आणायची नाही. या हेतून राज्यभर होणाऱ्या महाआरतीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली असून ‘आपण पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन.’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

मनसे बॅकफूटवर, राज्यभरात होणारी महाआरती रद्द
राज ठाकरेंनी ट्वीटमध्ये लिहलं की,

‘उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन.’

दरम्यान, मनसे आणि हिंदुत्ववादी संघटना उद्या अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर राज्यातील प्रत्येक शाखेमध्ये महाआरती करणार होते. पण हा निर्णय रद्द झाल्यामुळे आता राज ठाकरे उद्या काय भूमिका घेणार? यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील ‘या’ गावात लग्नच होत नाहीत, झाली तर टीकत नाही; वाचा काय आहे कारण?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here