कीव :रशिया (Russia) आणि यूक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या दोन महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. रशियानं नाटोतील (Nato) सहभागाच्या मुद्यावरुन यूक्रेनविरुद्ध लष्करी कारवाई सुरु केली. रशियानं पूर्व यूक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरु ठेवले आहेत. रशियानं मारियुपोवर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु ठेवले होते. मारियुपोलमधी अझावोत्सल पोलाद कंपनीत मोठ्या प्रमाणावर नागरिक होते. युद्ध सुरु असल्यानं दोन्ही देशांचे नागरिक अडकून पडले होते. संयुक्त राष्ट्राचे प्रमुख (United Nations) अँटोनियो गुटारेस यांनी गेल्या आठवड्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि यूक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षांनी पुतीन यांच्यासोबत चर्चेदरम्यान मारियुपोलचा मुद्दा उपस्थित केला होता. पोलाद कंपनीत लपलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मार्ग काढण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. त्याप्रमाणं दोन्ही देशांनी मारियुपोलमधील युद्ध थांबवत नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.
‘पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या सांगेन’, राज ठाकरेंच्या ट्वीटमुळे खळबळ
संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनिया गुटारेस यांनी रशिया आणि यूक्रेन यांना केलेल्या आवाहनाचा परिणाम दिसून आला आहे. मारियुपोलमधील स्टील कंपनीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रविवारी १०० नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. यूक्रेनच्या राष्ट्पती कार्यालयाचे प्रमुख एँड्री यरमक यांनी त्यामध्ये महिला, मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली आहे. नागरिकांच्या सुरक्षित सुटकेनंतर दोन्ही देशांमध्ये श्रेयवादाला सुरुवात झाली आङे. यूक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून सोशल मीडियावर याबद्दल माहिती देण्यात येत आहे. तर, रशियाच्या डिफेन्स फोर्सकडून राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना श्रेय देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
ब्राह्मण असल्याने पवारांची पुरंदरेंवर टीका? अत्रे, SM जोशी, डांगे ते गोरे, आव्हाडांनी यादी वाचली
यूक्रेनच्या मारियुपोलमधील अझावोत्सल पोलाद कंपनीवर रशियाला अजून ताबा मिळवता आलेला नाही. मारियुपोलमधील कंपनीत यूक्रेनचे २ हजार सैनिक आणि १ हजार सामान्य नागरिक अडकले आहेत. मारियुपोलमध्ये अनेक ठिकाणी १ लाख लोक अडकले आहेत.

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध २४ फेब्रुवारीला सुरु झाल्यानंतर अनेक देशांनी त्यांची उच्चायुक्त कार्यालय बंद केली होती. दक्षिण कोरियानं यूक्रेनची राजधानी कीवमधील उच्चायुक्त कार्यालय सुरु केलं आहे. न्यूझीलंडनं रशियाचे राजकीय नेते आणि संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांवर यूक्रेन युद्धामुळं निर्बंध घातले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here