मुंबई :आई कुठे काय करते मालिकेत समृद्धी बंगल्यात रोजच काही नाट्य घडत आहे. कधी संजना ब्लॅकमेल करते, कधी अरुंधतीचं म्हणणं पटतंय, कधी अभी घर सोडून जायचं म्हणतो. या सगळ्यात अरुंधती आणि आशुतोष यांच्या लव्ह स्टोरीचं काय हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. कारण अरुंधती पुन्हा एकदा देशमुख कुटुंबातच गुंतत जाताना दिसते. प्रेक्षकांना आशुतोषवर अन्याय होऊ नये असं वाटत आहे.

आतापर्यंत आपण पाहिलं की आशुतोष नेहमी एकच बोलत असतो. ‘माझं अरुंधतीवर प्रेम आहे. पण ते माझ्यापुरतंच. माझी तिच्याकडून काहीही अपेक्षा नाही.’ तर अरुंधतीला प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची वाटतेय. तसं ती नेहमीच व्यक्त करते. देशमुखांच्या घरात यश, आप्पांना तर दोघांनी लग्न करावं असं वाटतं. अर्थात, अभी, अनिरुद्ध हे काही सहन करू शकत नाही.

Video : मलायका अरोराच्या ड्रेसने केला घात, कारमध्ये बसतानाच झाली गोची

सूत्रांच्या माहितीनुसार आशुतोष आता अरुंधतीला चक्क आय लव्ह यू म्हणणार आहे. अरुंधती आणि आशुतोष गप्पा मारताना, अरुंधती म्हणते आपण आनंदानं जगायला इथे आलो आहोत. नकोत त्या कटकटी. आयुष्य सुंदर आहे. त्यावर आशुतोष तिला आय लव्ह यु म्हणतो. तो असंही म्हणतो की माणसाच्या आयुष्याचा काही भरवसा नाही. मनातलं सांगून टाकलं पाहिजे. उद्याची काय खात्री? यावर अरुंधती कशी व्यक्त होते, याची उत्सुकता आहे.

या मालिकेत बऱ्याच उलथापालथी होणार आहेत. अभी अनघाला आपण घरापासून वेगळं होऊ या सांगतो. ते आता घरच्यांनाही कळणार आहे. यश-गौरीही दुरावणार असं दिसतंय. गौरी यशला सांगते आहे की,मला एक संधी मिळाली आहे ती मुंबईतली नाही.तेव्हा यश म्हणतो कुठली का असेना तू स्वीकार. पुणे, नाशिक कुठली का असेना. तू संधी स्वीकार. मी तुझ्याकडे वीकेंडला येत जाईन किंवा तुझ्यासोबतच असेन. तर त्यावर गौरी म्हणते नाही. ही संधी अमेरिकेतील आहे आणि मला ती स्वीकारावाशी वाटते. ही ऑफर दोन वर्षासाठी असल्याचे ती यशला सांगते. तेव्हा मात्र यश काहीसा नाराज होतो मात्र यश गौरीला परदेशात जाण्याची परवानगी देणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

काय घेणार अरुंधती निर्णय?

अनुपमा या बंगाली मालिकेचा हा रिमेक आहे. त्यात अनुज-अनुपमाचे लग्नाचे चौघडे वाजले आहेत. आता प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे अरुंधती काय म्हणते याची.

Aai Kuthe Kay Karte: यश आणि गौरीमध्ये येणार दुरावा? करिअरसाठी अमेरिकेला जाण्याचा घेणार मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here