मुंबई : हॉलिवूडची अभिनेत्री अंबर हर्ड आणि हॉलिवूड स्टार जॉनी डेप यांची लव्हस्टोरी आणि त्यांच्या लग्नाची जितकी चर्चा झाली नाही इतकी चर्चा त्यांच्या घटस्फोटाची झाली होती. आणि आता ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे ती त्यांच्यात सुरू असलेल्या कोर्टकेसमुळे. अंबरने जॉनीवर कौटुंबिक अत्याचाराची केस केली होती. त्याविरोधात जॉनीने अंबरवर ५० मिलीयन डॉलरच्या मानहानीचा दावा ठोकला आहे. याच केसच्या सुनावणीमुळे ही जोडी चर्चेत आली आहे.

अंबर जाॅनी

कोर्टात केसच्या सुनावणीदरम्यान जॉनी आणि अंबर यांचे वकील एकमेकांच्या साक्षीदारांची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीत असे काही मुद्दे बाहेर येत आहेत की त्यामुळे अंबर वैतागली आहे. जॉनीचे वकील ज्याप्रमाणे जॉनी आणि अंबरच्या कौटुंबिक गोष्टी बाहेर काढत आहेत ते पाहून अंबर वैतागली आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या सुनावणीत अंबर आणि जॉनी यांच्यात झालेल्या घरगुती वादाचा विषय आला होता. त्या वादानंतर अंबरने दोघांच्या कॉमन बेडवर टॉयलेट केल्याचे सांगण्यात आले.

अखेर तो क्षण आलाच, आशुतोषनं अरुंधतीला म्हटलं I Love You

अंबर हर्ड जाॅनी डेप

ही माहिती घरातील कर्मचाऱ्यांनाच होती. त्यामुळे अंबरला तिच्या जनसंपर्क टीमचा राग आला. तर अंबर तिहेरी शरीरसंबंध ठेवत असल्याचीही बातमी छापून आली. अंबर तिच्याविषयी छापून येणाऱ्या या नकारात्मक बातम्यांबाबत तिच्या जनसंपर्क टीमला दोषी मानत आहे. त्यावरूनच तिने पीआर टीमला नोकरीवरून काढून टाकलं आहे. आता तिने नवी पीआर टीम तयार केली आहे.

PHOTOS: प्रियांका आणि निकची संपत्ती आहे तरी किती?

अंबर जाॅनी डेप

दरम्यान, अंबर आणि जॉनी ‘द रम डायरी’ या सिनेमाच्या निमित्ताने भेटले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०१५ ला त्यांनी लग्न केलं तर २०१७ मध्ये ते एकमेकांशी पटत नसल्याने विभक्तही झाले. अंबरने जॉनीवर कौटंबिक अत्याचार करत असल्याचा आरोप केला. तर जॉनीने अंबरवर मानहानीचा दावा ठोकला आहे. जॉनीचं म्हणणं आहे की अंबरच्या चुकीच्या आरोपांमुळे त्याचं अभिनय करिअर धोक्यात आल्यानेच तिच्याविरोधात केस केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here