पुणे : ‘कैलास स्मशानभूमीत अंत्यविधीप्रसंगी पेट्रोलमुळे झालेला स्फोट हा संबंधित मृताच्या नातेवाइकांच्या हलगर्जीपणानेच झाला आहे. यामध्ये महापालिका सेवकांचा काहीही दोष नाही,’ असा अहवाल महापालिकेच्या विद्युत विभागाने सादर केला आहे. दरम्यान, शहरातील सर्व स्मशानभूमींमध्ये अग्निरोधक यंत्रणांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे. (Pune News Updates)

शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असताना पेट्रोलचा भडका उडून मृताचे नातेवाइक भाजल्याचा प्रकार शनिवारी घडला होता. यामध्ये १० ते १२ जण काही प्रमाणात भाजले. त्यातील काहींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यांनी या घटनेबाबत सविस्तर अहवाल अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

संप मिटूनही एसटी सेवा रखडतच!; ‘यामुळे’ ४० लाख प्रवाशांना फटका

‘स्फोटाची घटना घडली, त्या वेळी कैलास स्मशानभूमीत सुरक्षारक्षक होता. मात्र, अंत्यविधीप्रसंगी ३०० ते ४०० नागरिक उपस्थित होते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे सुरक्षारक्षकाच्या क्षमतेपलीकडे होते. ठेकेदाराकडील ऑपरेटर ब्लोअर सुरू करण्यासाठी जातानाच ही घटना घडली. नागरिकांनी वाहने नीट पार्क न केल्याने रुग्णवाहिका घटनास्थळापर्यंत पोहोचली नाही. अंत्यविधीच्या ठिकाणी पेट्रोलचा वापर बेकायदेशीर असल्याने हा अपघात मृताच्या नातेवाइकांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. त्यामुळे या अपघातात महापालिका सेवकांचा काहीही दोष नसल्याचे आढळून आले आहे,’ असे या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, २६ फेब्रुवारी २०१८ रोजी तत्कालीन आयुक्त कुणालकुमार यांनी काढलेल्या आदेशानुसार शहरातील दहन व दफनभूमींच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्यात आले. त्यानुसार विविध जबाबदाऱ्या क्षेत्रीय सहायक आयुक्तांवर सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here