बुलडाणा : शहराच्या बाहेरील जनुना भाग परिसरात गोयनका यांच्या मालकीच्या फटाक्यांच्या गोडाऊनला २ मे रोजी फटाक्यांनी अचानक पेट घेतल्याने भीषण आग लागली. आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांना धूर दिसू लागताच अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यानंतर खामगाव नांदुरा व शेगावचे अग्निशामक दल तात्काळ पोहचले. शेगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे वाहन चालक मुरलीधर लखाडे पाटील, फायरमन मोसिम खान यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

आगीच्या घटना वाढल्या…
कडक उन्हाळा सुरू असल्यामुळे आगींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. खामगाव येथील नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड वर १५ दिवसांपूर्वी मोठी आग लागली होती. त्यानंतर शेगावच्या डम्पिंग ग्राउंडवर सुद्धा आग लागलेली होती. त्यातचं आता काल खामगाव येथील फटाका व्यवसायांच्या गोदाममध्ये फटाक्यांनी पेट घेतल्याने आग लागली. त्यामुळे आता आगीच्या घटना चारही बाजूने वाढत असून वेळीच आग नियंत्रणात आल्याने या ठिकाणच्या घटना तातडीने आटोक्यात येत आहेत. मात्र, एखाद्या वेळी आग विझविण्याचा उशीर झाल्यास त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागतात. त्यामुळे प्रशासनाने याबाबत दक्ष राहून त्यांना २४ तास सूरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here