मोदी यांनी जर्मनीतील अनिवासी भारतीयांशी संवाद साधताना मी जेव्हा करोडो भारतीयांच्या क्षमतेबद्दल बोलतो, त्यांचं कौतुक करत असतो त्यावेळी फक्त भारतात राहणारे लोक नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांबाबत देखील बोलत असतो, असं मोदी म्हणाले.
भारतीय जनतेनं ३० वर्षानंतर पूर्ण बहूमत असलेलं सरकार २०१४ मध्ये निवडून दिलं. त्यानंतर २०१९ मध्ये जनतेनं त्या सरकारला मजबूत केलं. आपण देशाच्या स्वातंत्र्यांचं ७५ वं वर्ष साजर करत आहोत. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे जो स्वतंत्र भारतात जन्माला आला, असं देखील मोदी म्हणाले. आपण जेव्हा स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करु त्यावेळी आपण अग्रस्थानी असणार आहोत. भारत आपल्या ध्येयाकडं वेगानं वाटचाल करत आहे, असं मोदी म्हणाले.
मोदी सरकार आवश्यक सुधारणांद्वारे देशात परिवर्तन घडवत असल्याचं मोदी म्हणाले. सुधारणांसाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असल्याचं मोदींनी सांगितलं. भारतीय लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणं, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासह भारत इतर क्षेत्रांमध्ये पुढं जात आहे. भारत-जर्मनी आंतर सरकारी कराराच्या सहाव्या फेरीनंतर नरेंद्र मोदींनी भारतीय समुदायाला मार्गदर्शन केलं.
आज ज्यावेळी जग गव्हाच्या टंचाईचा सामना करत आहे, त्यावेळी भारताचा शेतकरी जगाचं पोट भरण्यासाठी पुढं येत आहे. मानवतेवर ज्यावेळी संकट येतं त्यावेळी भारतानं त्या संकटावरील उपाय शोधला आहे. हा नवा भारत असून ही नव्या भारताची ताकद असल्याचं मोदी म्हणाले.
आपण शासनव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. यातून नव्या भारताची राजकीय इच्छाशक्ती दिसून येत आहे. आता कोणत्याही पंतप्रधानाला आम्ही दिल्लीतून १ रुपया पाठवतो आणि लोकांपर्यंत १५ पैसे पोहोचतात असं म्हणावं लागणार नसल्याचं मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचं नाव न घेता ही टीका केली आहे.
पंतप्रधानांनी मिसळला लहानग्याच्या सुरात सूर; चुटकी वाजवत दिली साथ