सुरज कांबळे

तरुण पिढीचे वेगवेगळे प्रश्न मांडण्यासाठी अनेक माध्यमं सध्या उपलब्ध झाली असून त्यातीलच एक माध्यम म्हणजे वेब चित्रपट. अनेक तरुण कलाकार वेब चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना पडणारे प्रश्न जगासमोर आणत आहेत. ” हा वेब सिनेमा अशाच एका प्रश्नावर भाष्य करतो. कृणाल राणे या तरुणाने हा सिनेमा लिहिला असून तो त्यानंच दिग्दर्शितही केला आहे. युट्यूबवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला महिन्याभरात दहा लाख व्ह्यूज मिळाले आहेत. आणि या दोघांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.

लग्न कशासाठी करावं याची समज येण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते, असं सध्याच्या तरुण पिढीला वाटतं. विचारस्वातंत्र्य हवं; पण तरी विश्वासही हवा. या दोन गोष्टींमधून प्रेम जन्म घेतं. याचसाठी आपल्या साथीदाराला नीट ओळखणं गरजेचं असतं, फक्त काही भेटीत लग्नाचा निर्णय घेणं हे अनेकांना अमान्य असतं. हाच विषय कृणालने वेब चित्रपटातून मांडला आहे. लग्नबंधनात अडकण्याआधी एकमेकांना जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी नील व मृगसी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागतात. या त्यांच्या निर्णयामुळे होणारा गोंधळ आणि त्यांचं खुलणार नातं हे या सिनेमात दाखवलं आहे.

‘मालिका केल्यानंतर वेब सिनेमा हे माध्यम माझ्यासाठी नवीन होतं. तरुणांना भेडसावणाऱ्या विषयावर एखादी कलाकृती सादर करायची असते तेव्हा तो विषय फार गांभीर्यानं घेतला जातो. नील आणि मृगसीची ही कथा आपले प्रश्न आपणहून कसे सोडवायचे हे सांगते. अनेकदा आपण निर्णय घेतो, पण त्यांचे परिणामसुद्धा आपल्याला माहिती हवे. लग्न जुळण्याची एक विशिष्ट बाजू नील मृगसी कथा मांडते’, असं कुंजिका काळवीट म्हणाली. या चित्रपटात स्मिता सरोदे प्रतिक म्हात्रे सई जोशी हे कलाकारसुद्धा आहेत. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी सुयश आचार्यने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here