संप व कोरोनामुळे एसटी महामंडळ मोठ्या प्रमाणात तोट्यात गेले आहे. त्यातच ५ महिन्यानंतर एसटीची सेवा जिल्ह्यात पूर्वपदावर आली आहे. जिल्ह्यात ४ आगारातून १६५ बसेस धावतात. मात्र, मागील काही दिवसांपासून फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. यावर आळा घालण्यासाठी आता एसटी महामंडळ प्रशासनाने तिकीट दराच्या पाचपट दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या दंडामुळे फुकट्या प्रवाशांची कानात चांगलीचं चपराक बसणार आहे.
एसटीचा महसूल वाढविण्यावर भर…
संपामुळे तोट्यात गेलेल्या एसटी महामंडळाला नफ्यात आणण्यासाठी राष्ट्रीय परिवहन महामार्ग महामंडळाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, हे सर्व करत असताना बस नादुरुस्त झाली तर दुरुस्तीसाठी वेळेवर सामान न मिळणे यांसह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच काही प्रवासी वाहकाची नजर चुकून विनातिकीट प्रवास करतात. अशा प्रवाशांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
प्रवास भाड्याच्या पाचपट दंड…
विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या ७ आगारातील बसमधून विनातिकीट प्रवास करणारा प्रवासी आढळून आल्यास तीन मार्ग तपासणी पथकांकडून त्या प्रवाशाला प्रवास भाड्याच्या दुप्पट किंवा शंभर रुपये दंड आकारला जातो. मात्र, आता त्यामध्ये वाढ करून विनातिकीट प्रवासी आढळला तर त्याच्याकडून प्रवासी भाड्याच्या पाचपट दंड आकारला जाणार आहे.
चांगल्या फोटोसाठी महागड्या फोनची गरज नाही, ‘या’ ५ टिप्स फॉलो करून काढा प्रोफेशनल फोटो