जोधपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्या जोधपूर (Jodhpur) जिल्ह्यात दोन गटांमधील वादाचं रुपांतर दगडफेकीत झालं. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणल्यानंतर आज सकाळी देखील दगडफेक झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या प्रकरणी शांततेचं आवाहन केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाली, त्यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार देखील केला. जिल्हा प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला आणि रात्रापासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?
जालोरी गेट जवळील बालमुकुंद बिस्सा सर्कलजवळ हा प्रकार घडला. स्वातंत्र्य सैनिकाच्या फोटो जवळ लावलेला भगवा झेंडा काढून टाकत दुसरा झेंडा लावण्यात आल्यानं वादाला सुरुवात झाली. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर मारामारीला सुरुवात झाली. मारामारीनंतर दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली असून यामध्ये काही लोक जखमी झाले आहेत. या वादाची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी पोहोचलं आणि जमावाला पांगवण्यात आलं.
राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची ‘हाय व्होल्टेज’ बैठक; घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ
दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला, अश्रूधुराच्या कांड्या देखील फोडल्या. जमावाला पांगवणाऱ्या पोलिसांवर देखील दगडफेक झाली. यामध्ये २ पोलीस अधिकारी आणि २ पोलीस कर्मचारी जखमी झाली आहेत. मात्र, परिस्थितीतवर पोलिसांनी नियंत्रण मिळवलं आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
‘राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, धमक्या देणाऱ्यांची तेवढी ताकद नाही’पोलीस आणि प्रशासनानं जोधपूरमधील जनतेला शांततेच्या वातावरणात सण साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. जिल्हा प्रशासनानं तणावपूर्ण स्थिती असल्यानं इंटरनेट बंद केलं आहे. आज सकाळी पुन्हा एकदा १५ ते २० गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती आहे. जयपूरहून वरिष्ठ पोलीस अधिकारी जोधपूरला रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जोधपूरमधील जालौरी गेट जवळ दोन गटांमध्ये तणाव निर्माण होणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. प्रशासनानं शांतता कायम राखण्यासाठी कडक पावलं उचलावीत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जोधपूर, मारवाडच्या प्रेम आणि बंधुभावाच्या पंरपरेचा सन्मान करत सर्वांना शांतता कायम राखण्याचं आवाहन करतो, असं गहलोत म्हणाले.

चाहत्यांच्या काळाजाचा ठोका चुकवणारा मिथुन चक्रवर्तींना फोटो व्हायरल; मुलानेच दिली महत्त्वाची अपडेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here