मुंबई : आरआरआर सिनेमा प्रदर्शित होऊन दीड महिना झाला तरी अजूनही बॉक्स ऑफिसवर कमाईचा पाऊस सुरूच आहे. आरआरआर सिनेमा बघण्याचं प्लॅनिंग बरेचजण करत आहेत. या सिनेमाच्या गाण्यांनी, डायलॉगजनी भुरळ पाडली आहे. सामान्य प्रेक्षकांसोबत सेलिब्रिटी कलाकारांनीही आरआरआर पाहण्यासाठी थिएटरकडे मोर्चा वळवला होता.

त्यात आता अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनीही आरआरआर सिनेमा एकत्र पाहण्याची मजा लुटली. पण मोठ्या पडद्यावर गाजलेली ही जोडी बऱ्याच वर्षांनी एकत्र सिनेमा पहायला आल्याने त्यांना डेटवर आल्यासारखं वाटत होतं. अनुपम खेर यांनी दोघांचा एक मस्त व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिलेल्या कॅप्शनला चाहत्यांकडून लाइक्स मिळत आहेत.

अॅमेझॉन प्राइमवर ‘पंचायत २’ येतोय, इथे जाणून घ्या कधी आणि कसा पाहायचा हा सुपर हिट ड्रामा

अनिल कपूरअनुपम खेर

अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी अनेक हिंदी सिनेमांत एकत्र काम केलं. अनिल कपूर नायक असलेल्या बऱ्यास सिनेमात अनुपम खेर यांच्या चरित्र भूमिका गाजल्या आहेत. सध्या हे दोघंही मोजकेच सिनेमे करत असल्याने दोघांची भेट कमीच होते. मात्र इव्हेंटमध्ये हे दोघं भेटत असतात पण तेव्हा फारशा गप्पा मारता येत नाहीत. आरआरआर सिनेमाच्या निमित्ताने थिएटरमध्ये आलेल्या अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. दोघं एकत्र सिनेमा करायचे तेव्हा त्याच्या प्रीमियरला एकत्र जायचे. पण तो काळ खूपच मागे पडल्याच्या भावना दोघांनी व्यक्त केल्या.

अनिल कपूर अनुपम खेर

अनुपम खेर यांनी व्हिडिओ शेअर करत असं लिहिलं आहे की, माझा खास आणि मिश्कील मित्र अनिल कपूरसोबत सिनेमा बघायला येणं ही पर्वणी आहे. त्यात तो सिनेमा आरआरआर असेल तर काय विचारूच नका. या गप्पांमध्ये थार या सिनेमाचाही विषय निघाला ज्यामध्ये अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अर्थात या सगळ्या गप्पा सिनेमा सुरू होण्यापूर्वी झाल्या. त्यामुळे सिनेमाला आलोय की डेटवर आलोय असं दोघांनाही वाटत होतं.

अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल, भर रस्त्यात प्रॅन्क करणं पडलं महाग

अनुपम खेर यांनी नुकताच द कश्मीर फाइल्स या सिनेमात काम केलं आहे. त्यांच्या भूमिकेची खूप चर्चा झाली. तर अनिल कपूर लवकरच जुग जुग जिओ या सिनेमात दिसणार आहेत. सध्या तरी पडद्यावर या दोघांची जोडी जमण्याची काहीच संधी नाही, पण आरआरआर सिनेमाच्या निमित्ताने या जोडीने शेअर केलेले फोटो व व्हिडिओ पाहून त्यांच्या चाहत्यांना ट्रीट मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here