परभणी : जावयाला नवीन मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्यानंतर रक्कम देण्यास नकार दिल्याने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना जिंतूर तालुक्यातील धानोरा शिवारात घडली आहे. या प्रकरणी गणेश रामदास राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बामणी पोलीस ठाण्यात एकूण ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी…

गणेश रामदास राठोड यांच्या मुलीचे लग्न गावातील युवकासोबत झाले आहे. लग्नानंतर जावयाच्या घरचे लोक या ना त्या कारणाने पैशाची मागणी करत होते. त्यानंतर त्यांनी मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करत वाद घातला. मुलींच्या वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर संबंधितांनी शेत आखाड्यावर येत फिर्यादी आणि त्यांच्या परिवाराला जबर मारहाण केली.

मोठी बातमी : शिराळा कोर्टाचं राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; पोलीस काय भूमिका घेणार?
५ जणांविरोधात गुन्हा दाखल…

मारहाणामध्ये गणेश रामदास राठोड यांचा मुलगा युवराज गंभीर जखमी झाला. आरडाओरड केल्याने मारहाण करणारे निघून गेले. मारहाण करणारे फिर्यादी जवळ असलेले ३० हजार एवढी रक्कम घेऊन गेले. जखमी युवराजला उपचारासाठी जिंतूर तेथून परभणी आणि पुढे नांदेडला नेण्यात आले. या प्रकरणी संपत चव्हाण, गणपत चव्हाण, संदिप चव्हाण, कमल चव्हाण, सखुबाई चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

जोधपूरमध्ये झेंड्यावरुन दोन गट भिडल्यानं दगडफेक; पोलिसांचा लाठीमार, इंटरनेट बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here