मुंबई : मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दादरमध्ये आज, शनिवारी करोनाचा संसर्ग झालेले नवे पाच रुग्ण आढळले असून, त्यातील चार जण हे एकाच कुटुंबातील आहेत. ६९ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. सात एप्रिलला चाचणी अहवालातून स्पष्ट झाले होते. त्याच्या संपर्कात हे चौघेही आल्याची माहिती मिळते.
ज्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला होता. त्याच्या प्रवासाचा कोणताही इतिहास नव्हता, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. सध्या ही व्यक्ती कस्तुरबा रुग्णालयात दाखल असून, संबंधित यंत्रणा ही त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत आहे. त्यातील पाच जणांना शोधले आणि त्यांचे स्वॅब नमुने चाचणीसाठी नेण्यात आले. आज त्याचा अहवाल आला. एकाच कुटुंबातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यात दोन महिलांचे वय अनुक्रमे ३८ वर्षे आणि ५१ वर्षे आहे. तर एका ५१ वर्षीय व्यक्तीसह ३० वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त अन्य एकाला करोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती येथील असून, दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयातील कर्मचारी आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times