ट्विटरवर राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत असलेला व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे समोर आलेलं नाही. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा नाईटक्लब मध्ये होते. सध्या त्यांच्या पार्टीत समस्या असताना ते नाईट क्लबमध्ये असल्याची टीका मालवीय यांनी केली.
राहुल गांधींचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा काठमांडूमधील एका नाईट क्लबमधील असल्याचा दावा, सोशल मीडियावरुन करण्यात आला आहे. काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशात समस्या असताना साहेब परदेशात असल्याची टीका केली होती. यानंतर राहुल गांधींचा नेपाळच्या काठमांडूमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप नेत्यांनी आता राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली आहे.
ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत दिसणारी ती महिला नेमकी कोण याबाबत देखील चर्चा सुरु झाल्या आहेत. ट्विटरवरील काही यूजर्सनी ती महिला चीनची नेपाळमधील राजदूत असल्याचा दावा केला आहे. द हॉक आय या ट्विटरवरुन असा दावा करण्यात आला आहे.
द काठमांडू पोस्टच्या दाव्यानुसार सीएनएनची माजी कर्मचारी सम्निमा उदास हिचा विवाहर नीमा मार्टिन शेरपा याच्यासोबत होणार आहे. हा विवाह सोहळा आज पार पडणार असून ५ मे रोजी एका हॉटेलमध्ये स्वागत समारंभ होणार आहे. राहुल गांधी यांच्यासह भारतातील इतर प्रमुख व्यक्ती देखील विवाह सोहळ्यासाठी पोहोचले आहेत.
राहुल गांधी ऑगस्ट २०१८ मध्ये कैलास मान सरोवरला जाण्यासाठी काठमांडूला गेले होते. राहुल गांधी यांचा यावेळचा दौरा खासगी असल्याचं बोललं जात आहे.
‘अक्षय्य तृतीया’ला खानदेशी तडका म्हणजे ‘खापरावरची पुरणपोळी’