मुंबई :सलमान खान आणि त्याचा नवा सिनेमा या समीकरणाला एक किनार आहे. दरवर्षीच्या ईदच्या मुहूर्तावर सलमान त्याचा नवा सिनेमा प्रदर्शित करतो. सलमानच्या सिनेमाला त्याचे चाहते जोरदार प्रतिसाद देतात. त्यामुळे सलमानच्या ईद पार्टीची उत्सुकता असते. या पार्टीला सगळं खान कुटुंब तर असतंच शिवाय सेलिब्रिटींचीही मांदियाळी असते. यंदाच्या ईद दिवशी सलमानचा कोणताच नवा सिनेमा झळकणार नाही मग ईद पार्टीचं काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण सिनेमा जरी नसला तरी सलमानची ईद पार्टी दणक्यात होणार आहे. सलमानच्या आयुष्यातील एक खास व्यक्ती त्याच्यासाठी ही पार्टी ठेवणार आहे. त्याची जोरदार तयारी केली आहे.


सलमानचं त्याची बहीण अर्पितासोबत खूपच जवळचं नातं आहे. सलमानच नव्हे तर अरबाज आणि सोहेल हे तिघेही भाऊ दोन्ही बहिणींसाठी काहीही करायला तयार असतात. त्यांच्या अनेक व्हिडिओ आणि फोटांमधून चाहत्यांना हे माहिती आहे. अर्पिताचा नवरा अभिनेता आयुष शर्माला सिनेमात डेब्यू करण्यापासून ते त्याचं अभिनय करिअर मार्गी लावण्यात सलमानने खूपच मदत केली आहे. थोडक्यात खान परिवारात भावंडांच्या प्रेमाचे किस्से चाहत्यांपर्यंत पोहोचतच असतात.

अक्षय कुमारने पुन्हा एकदा शेअर केला नरेंद्र मोदींचा Video, म्हणाला-‘तुम्हाला पाहून

सलमान खान अर्पिता

याच प्रेमाखातर अर्पिता आणि आयुष यांनी सलमानसाठी यंदा ईदची पार्टी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी जानेवारीमध्ये अर्पिता आणि आयुष यांनी मुंबईतील खार परिसरात आलिशान घर खरेदी केलं आहे. या नव्या घरातच सलमानसाठी अर्पिता आणि आयुषने खास ईदची जंगी पार्टी ठेवली आहे. या पार्टीची जोरात तयारी करण्याचे काम सुरू आहे.

‘स्त्री काही तुमच्यासाठी कधीही उपलब्ध नसते, संजना हेच दाखवते’


ईदच्या संध्याकाळी ही पार्टी होणार आहे. या पार्टीला खान आणि शर्मा कुटुंबीय तर आहेच पण सलमानचे सगळे मित्र, बॉलिवूडमधील कलाकारांना निमंत्रण देण्यात आलं आहे. दरवर्षी ईदच्या पार्टीची सगळी तयारी सलमान स्वत: करत असतो. यावर्षी मात्र हे चित्र वेगळं आहे. यंदा सलमान फक्त ही पार्टी एन्जॉय करणार आहे अशी ताकीदच अर्पिता आणि आयुषने दिली आहे. लवकरच या पार्टीचे व्हिडिओ, फोटो अर्पिता शेअर करेलच, तोपर्यत सल्लूमियाँच्या चाहत्यांना धीर धरावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here