यावेळी जयंत पाटील यांनी भोंग्यांच्या मुद्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर टीका केली. देशात महागाई इतकी वाढली आहे की, सामान्य माणसाला दुसऱ्या दिवशी काय करायचे, हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी दडवण्यासाठी प्रयत्न राजकीय भोंगे वाजवले जात आहेत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
अंबादास दानवेंची फडणवीसांवर टीका
शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी फडणवीस यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. अंबादास दानवे एक फेसबुक पोस्ट टाकली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे एका आंदोलनातील जुने छायाचित्र दिसत आहे. या छायाचित्रासोबत अंबादास दानवे यांनी, ‘लाठी चार्ज झाला की….… पळणारे म्हने बाबरी पाडायला गेला होता’, अशी कॅप्शन लिहली आहे.
‘सामना’तूनही देवेंद्र फडणवीसांवर टीका
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तूनही याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले आहे. बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसैनिक अयोध्येत नव्हता, असे फडणवीस म्हणतात. फडणवीस म्हणतात, म्हणजे तेथे ते असणारच, पण सीबीआयच्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रात त्यांचे नाव कोठेच दिसत नाही. शिवसेनेचे अनेक नेते आणि शिवसैनिकांची नावे बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. मग देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारत होते का, याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल, अशी खोचक टिप्पणी शिवसेनेने केली होती.
‘राम मंदिरा करता बदायूच्या तुरुंगात मी 18 दिवस घालवले’; फडणवीस शिवसेनेवर बरसले