हार्दिक पटेल यांनी ट्विटरच्या बायोमध्ये आता स्वाभिमानी देशभक्त, सामाजिक राजकीय कार्यकर्ता आणि चांगल्या समाजासाठी जबाबदार नागरिक, असा उल्लेख ठेवला आहे. गुजरात काँग्रेसनं मतभेद दूर करण्यासाठी हार्दिक पटेल यांना चर्चेचं आमंत्रण दिलं आहे. गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख जगदीश ठाकोर यांनी माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
पटेल यांनी गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेससंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. हार्दिक पटेल यांनी माझे प्रश्न हे केंद्रीय नेतृत्त्वाशी संबधित नसून राज्य पातळीवरील नेतृत्त्वाशी संबंधित असल्याचं म्हटलं होतं. पटेल यांनी गेल्या आठवड्यात व्हाटसअपवरुन काँग्रेसचा उल्लेख हटवला होता. काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त करत पटेल यांनी भाजपचं कौतुक केलं होतं.
हार्दिक पटेल यांनी भाजपकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे, असं म्हणत काँग्रेसकडे निर्णय घेण्याच्या क्षमतेचा अभाव असल्याची टीका केली होती. हिंदू असल्याचा गर्व असल्याचं देखील हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल यांची नाराजी काँग्रेससाठी चिंताजनक ठरु शकते. हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये राहणार की भाजप किंवा आपमध्ये प्रवेश करणार हे येणाऱ्या काळात समोर येईल. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पटेल आणि गुजरात प्रदेश काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. केंद्रीय काँग्रेसचं नेतृत्त्व हार्दिक पटेल यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार का हे पाहावं लागणार आहे. हार्दिक पटेलच्या नाराजीचा फटका काँग्रेसला बसू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दंगली झाल्या तर कार्यकर्त्यांच्या श्रद्धांजलीचे बोर्ड लागतील; अमित ठाकरे फॉरेनला जातील | दीपाली सय्यद