मुंबई : बॉलिवूडमध्ये सत्तरच्या दशकात खलनायिका म्हटलं की एकच नाव होतं ते म्हणजे अरुणा इराणी यांचं. नायक आणि नायिका यांच्यात तिसरी व्यक्ती म्हणूनही सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका करणाऱ्या अरुणा इराणी यांनी बहुतांशी ग्रे शेडचे रोल केले आहेत. नृत्यातही त्या निपुण असल्याने त्यांचे अनेक डान्स सिनेमासाठी हिट ठरले आहेत. बॉलिवूडच्या या खलनायिकेने ३ मे रोजी ७६ वर्ष पूर्ण केली.


आजकाल अनेक अभिनेत्री अभिनयात सेकंड इनिंग सुरू करत असताना अरुणा इराणी यांनी या क्षेत्रापासून अंतर का ठेवलं आहे, असा प्रश्न त्यांचा चाहत्यांना पडतोय. काही वर्षापूर्वी त्या टीव्ही मालिकांमध्ये दिसत होत्या, पण गेल्या दोन वर्षापासून त्यांनी स्वत:ला अभिनयापासून अलिप्त ठेवलं आहे. यापुढे अभिनय करायचा नाही असा दबाव कुटुंबियांकडून टाकल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

यंदा सलमान खानची ईद मुबारक होणार हटके, ही खास व्यक्ती देणार अभिनेत्याला पार्टी


अरुणा यांनी अभिनय थांबवावा असं सांगण्यामागे त्यांच्या कुटुंबियांची तळमळ आहे. दोन वर्षापूर्वी करोनाची भयंकर लाट आली. या काळात अनेकजणांना आपल्या जवळची माणसं गमवावी लागली. अरुणा यांचं सध्याचं वय ७६ वर्ष असल्याने त्यांनी तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे, असं त्यांच्या कुटुंबियांना वाटतं. अरुणा यांनाही कुटुंबियांची काळजी कळते, त्यामुळेच त्यांनी जोपर्यंत करोनाची साथ पूर्णपणे आटोक्यात येत नाही तोपर्यंत अभिनय करण्याचा विचार करायचा नाही असं ठरवलं आहे.

अरुणा इराणी

अरुणा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा अनुभव सांगितला आहे. त्या म्हणताहेत, की खरं तर मला अभिनयासाठी खूप ऑफर्स येत आहेत. कधी कधी मला वाटतं की काळजी घेऊन सेटवर जावं, पण पुन्हा मनात करोनाची भीती येते आणि पाय मागे ओढले जातात. कमीत कमी या वर्षाच्या अखेरपर्यंत तरी मी कोणताही नवा सिनेमा किंवा मालिका साइन करणार नाही.

अनुपम खेर आणि अनिल कपूर थिएटरमध्ये गेले डेटवर, काय आहे नेमका किस्सा?


अरुणा इराणी यांनी अनेक गाजलेल्या सिनेमात काम केलं आहे. यामध्ये बाँबे टू गोवा, उपकार, राजा बाबू, लाडला, लावारीस या सिनेमात अरुणा यांनी अभिनय केला आहे. तसंच मै लक्ष्मी तेरे आंगन की, झाँसी की रानी, देखा एक ख्वाब या मालिकांमध्येही त्या दिसल्या होत्या. देश मे निकला होगा चाँद या मालिकेचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. बॉलिवूडच्या अनेक स्थित्यंतराच्या साक्षीदार असलेल्या अरुणा इराणी यांनी लवकरात लवकर सेकंड इनिंग सुरू करावी असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here