कीव:रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध ६९ व्या दिवशी देखील सुरु आहे. युद्धात हजारो नागरिकांनी जीव गमवाला आहे. अनेकांना युद्धामुळं कायमचं दिव्यंगत्व आलं आहे. काही जणांनी हात गमावले, काहींनी पाय देखील गमावले आहेत. रशियाकडून करण्यात आलेल्या स्फोटात आयुष्यभरासाठी दिव्यंगत्व आलेल्यांमध्ये २३ वर्षांची नर्स ओक्साना हिचा समावेश आहे. २७ मार्चला ओक्सानाच्य पायाजवळ भूसुरुंग फुटला त्यात तिनं तिचे दोन्ही पाय आणि डाव्या हाताची चार बोटं गमावली. मात्र, युद्धानं निर्माण झालेल्या वेदनांवर प्रेमानं विजय मिळवला आहे. ओक्सानानं दोन्ही पाय गमावले असताना देखील तिच्या प्रियकरानं तिच्यासोबत विवाह केला आहे.

ओक्साना आणि तिचा प्रियकर विक्टर या दोघांनी रुग्णालयातचं लग्न केलं. दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. विक्टर त्या व्हिडिओत ओक्सानाला उचलून घेताना नृत्य करताना दिसून येत आहे. या रुग्णालयातील रुग्ण लग्नाचे वऱ्हाडी होते, ते देखील या अनोख्या विवाहानं आनंदित झाले होते.
Sanjay Raut On Raj Thackeray : ‘कुणी कितीही मोठं असू देत, नियमांचं उल्लंघन कराल तर कारवाई होणारच’
ओक्साना आणि विक्टर गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत आहेत. ओक्साना आणि विक्टर यांनी पुढं काही होईल माहिती नाही, मात्र सोबत राहण्याचा निर्णय घेतला. ओक्साना आणि विक्टरच्या लग्नाची दखल यूक्रेनच्या संसदेनं देखील घेत व्हिडीओ ट्विट केला आहे.

लवीव मेडिकल असोसिएशनं जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार ओक्साना विक्टर तिच्या घरी जात होती. त्यावेळी तिनं नकळतपणे भूसुरुंगावर पाय ठेवला. याची माहिती विक्टरला देईपर्यंत स्फोट झाला. या स्फोटात विक्टर जखमी झाला नाही. मात्र, ओक्साना जखमी झाली होती. ओक्सनावर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या नंतर नीप्रोमध्ये शिफ्ट करण्यात आलं. कृत्रिम अवयव लावल्यानंतर ओक्साना आणि विक्टर लवीवला जाणार आहेत.
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच भाजप मैदानात, प्रवीण दरेकरांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध २४ फेब्रुवारीपासून सुरु झालं आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध संपवण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटारेस यांनी गेल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि यूक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतील होती. त्यानंतर मारियुपोलमधील लष्करी कारवाई थांबवण्यात आली असून स्टील कंपनीतून नागरिकांची सुटका करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here