मुंबई : टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. उर्फी अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. केवळ बोल्ड फोटो नव्हे तर उर्फी अतरंगी स्टाइलसाठीही तितकीच प्रसिद्ध आहे.

उर्फीचे कोणी चाहते आहेत की नाही हे माहिती नाही. परंतु फोटोग्राफर्सची उर्फी अत्यंत आवडती मॉडेल आहे. जिथं जिथं उर्फी जाते तिथं तिथं फोटोग्राफर्स येतात. ती येण्याची खबर फोटोग्राफर्सना आधी लागते आणि ती येण्याआधी तिथं ते पोहचतात. पण तिला तितकंच ट्रोल देखील करण्यात येतं.

अर्थात सोशल मीडियावरून ट्रोल झाल्यामुळं उर्फीला काहीच फरक पडत नाही. ती तिच्या विश्वात दंग असते. तिला हवं ते ती करत असते. हवे ते कपडे घालत असते आणि सोशल मीडियावर अतरंगी असे कपडे घालत फोटो व्हिडिओ पोस्ट करत असते.

बॉक्स ऑफिसवरही ‘चंद्रमुखी’चा खेळ रंगला, कोटीच्या कोटी उड्डाणे
उर्फी फॅशन आणि स्टायलिंगमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. पण तिचं कौतुक होण्यापेक्षा ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर जास्त असते. उर्फीच्या हटके अंदामुळं आणि बोल्डनेसमुं तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येतं. यावर उर्फी अनेकदा व्यक्त झाली आहे. परंतु या ट्रोलिंगमुळं कधीकधी हे सर्व सोडून द्याव्यसं वाटतं, असं उर्फीनं म्हटलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका स्टोरीमध्ये तिनं यावर भाष्य केलंय.


काय म्हणतेय उर्फी?
सोशल मीडियावर मला ट्रोल करण्यात येतं. त्याचा खूप त्रास होतो.अनेकदा रडावसं वाटतं, ओरडावंस वाटतं पण आपलं आयुष्य सुरू राहतं. ज्यांना माझ्याबद्दल ,माझ्या कामाविषयी कळत नाही, त्यांच्याकडं लक्ष देत नाही, पण काधीतरी तसं होत नाही. मला याचा त्रास होतो. सगळं बंद करावंस वायतं. ट्रोलिंगची, केमेंट्सची, बलात्काराच्या धमक्यांनी आता भीती वाटतेय’, असंही तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here