लाला ब्रजनंदन रस्तोगी यांचं २००३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले होतं. काशीपूरमधील त्यांच्या मालकीच्या जमिनीपैकी काही जमीन अनिता आणि सरोज यांच्याकडे वारसा हक्कानं गेली होती. नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर त्यांचे वडील लाला रस्तोगी यांना ती जमीन मुस्लीम समाजाला द्यायची इच्छा होती, अशी माहिती मिळाली. सरोज यांनी मीरत येथील त्यांच्या नेतावाईकांशी आणि अनिता यांनी दिल्ली येथील त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करत मुस्लीम समाजाला नमाज पठणासाठी जमीन देण्याचा नि्र्णय घेतला. रविवारी ईदच्या पर्वसंध्येला त्या काशीपूरमध्ये पोहोचल्या. अनिता आणि सरोज यांचे बंधू राकेश यांच्या सहकार्यानं जमीन ईदगाह कमिटीकडे यांच्याकडे देण्यात आली.
माझ्या वडिलांची जातीय आणि धार्मिक सलोखा अबाधित राहिला पाहिजे या विचाराचे होते, असं लाला ब्रजनंदन रस्तोगी यांचा मुलगा राकेश यांनी म्हटलं. गावातील मुस्लीम समुदायाला मोठ्या संख्येनं नमाज पठण करता यावं म्हणून वडिलांची ईदगाह साठी जमीन देण्याची इच्छा होती. माझ्या बहिणींनी ती इच्छा पूर्ण केली, असं राकेश म्हणाले.
काशीपूरमधील ईदगाह कमिटीचे प्रमुख हसीन खान यांनी लाला रस्तोगी हे दिलदार व्यक्तीमत्वाचे होते, असं म्हटलं. ते जीवंत असताना मुस्लीम समुदायाच्या कार्यक्रमासाठी ते सर्वप्रथम देणगी, फळं आणि खाद्यपदार्थ देखील देत असतं, असं खान यांनी म्हटलं. लाला रस्तोगी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राकेश यांनी देखील वडिलांचा वारसा जपला आणि आता अनिता आणि सरोज यांनी जमीन ईदगाह साठी दिल्याचं हसीन खान म्हणाले.
हसीन खान यांनी लाला रस्तोगी आणि माझे वडील मोहम्मद रझा खान यांच्यामध्ये ५० वर्षांची मैत्री होती, असं सांगितलं. दोघांचही निधन झालं असलं तर आम्ही दोन्ही समुदायांमधील बंधुभाव जपल्याचं खान यांनी सांगितलं आहे. काशीपूरमध्ये गुरुद्वारा, हनुमान मंदिराजवळच ईदगाह मैदान आहे. मात्र, इथं कधीचं धार्मिक तणाव निर्माण करणारी घटना घडली नाही, असं हसीन खान म्हणाले. रमजान ईदच्या दिवशी देखील हनुमान मंदिराच्या पुजाऱ्यांनी नमाज पठणाची वेळ विचारुन घेतली आणि त्यावेळेत त्यांनी मंदिरावरील लाऊड स्पीकर बंद ठेवल्याचं सांगितलं.
अजित दादा-भुजबळांची दिलजमाई; पण पवारांची डोकेदुखी वाढवणारा हा संघर्ष १९९९ लाच सुरू झाला