वाशी सेक्टर १७ मधील मधुबन या लेडीज बारमध्ये काम करणाऱ्या महिला या ग्राहकांसोबत अश्लील वर्तन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्ष तसेच युनिट तीनच्या पथकाने वाशी पोलिसांच्या मदतीने सोमवारी मध्यरात्री वाशी सेक्टर १७मधील मधुबन बारवर छापा मारला.
यावेळी बारमध्ये काम करणाऱ्या महिला या ग्राहकांसोबत अश्लील वर्तन करत असल्याचे तसेच बारचा मॅनेजर व वेटर त्यांना प्रोत्साहन देताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी १२ महिलांसह बारचा मॅनेजर आणि वेटर अशा एकूण १८ जणांना ताब्यात घेतले. या सर्वांवर वाशी पोलीस ठाण्यात कलम २९४नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.