जळगाव : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार जळगावात मनसैनिकांकडून आज सकाळी ६ वाजेनंतर शनी मंदिरात आरती करत हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मनसैनिकांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली होती. मनसैनिकांनी पोलीस प्रशासनाने आपण दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहून हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडला नाही.

जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावर असलेल्या शनी मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, आज पहाटे मशिदीवरील भोंग्याचा आवाज आला नाही, असा दावाही मनसैनिकांनी यावेळी केला कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काल रात्रीच मनसैनिकांना नोटीस बजावल्या होत्या शहरात तीन ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हिंदू भगिनींकडून २ एकर जमीन नमाज पठणासाठी दान, वडिलांची इच्छा पूर्ण करत सलोखा जपला
दरम्यान, जळगाव शहरातील शनीपेठ परिसरात मंगळवार ३ मे सायंकाळी मनसे व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मशिदीसमोर शनी मंदिरावर भोंग्यावर हनुमान चालीसा लावल्याने गोंधळ उडाला. त्यावेळी पोलिसांनी संबंधित मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here