ऋषिकेशः करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वकाही ठप्प आहे. सतत गर्दी असणाऱ्या पर्यटन स्थळांवर आता शांतता आहे. मात्र काहींना हे अजूनही समजत नाहीए. उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये काही बिनधास्तपणे गंगेच्या किनारी फिरताना आढळून आले.

लॉकडाऊनमध्ये पोलिसांचा सर्वत्र पहारा आहे. पोलीस सुरक्षेसाठी गस्त घालत आहेत. ऋषिकेशमध्येही पोलिसांनी कडक सुरक्षा ठेवली आहे. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना गंगेच्या किनाऱ्यावर काही पर्यटक फिरताना दिसले. अमेरिका, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलमधील हे पर्यटक आहेत. लॉकडाऊनचं उल्लंघ करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी यावेळी शिक्षा केली. त्यांच्याकडून कागदावर ५०० वेळा सॉरी लिहून घेतलं. मी लॉकडाऊनचं पालन केलं नाही. माफी मागतो/ मागते, असं ५०० वेळा पोलिसांनी त्यांच्याकडून लिहून घेतलं.

विदेशी पर्यटकांना बाहेर जाण्यास परवानगी देऊ नये, असे आदेश पोलिसांनी हॉटेल चालकांना दिले आहेत. खूपच आवश्यकता असल्यास स्थानिक नागरिकांनासोबतच विदेशी पर्यटकांना बाहेर पाठवावं, असं पोलिसांनी बजावलं आहे.

उत्तराखंडमध्ये ३५ रुग्ण

उत्तराखंडमध्ये करोना व्हायरसचे ३५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय. राज्यात सर्वाधिक १८ रुग्ण हे डेहराडूनमध्ये आढळून आले आहेत. नैनीतालमध्ये ८, उधम सिंह नगरमध्ये ४, हरिद्वारमध्ये ३, पौडी आणि अल्मोडामध्ये प्रत्येकी १ रुग्ण आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here