नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) परराष्ट्र दौऱ्याच्या दिवशी डेन्मार्कच्या (Denmark) पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनची भेट घेतली. मोदी आणि फ्रेडरिक्सन यांच्यामध्ये दोन्ही देशांसंबंधी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. नरेंद्र मोदींनी डेन्मार्कमधील अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. भारताचे आणि डेन्मार्कचे संबंध मजबूत असल्याचं मोदींनी म्हटलं. नरेंद्र मोदींनी करोना (Corona) संसर्गामधील भारत सरकारच्या कामगिरीची माहिती दिली. करोना संसर्गाचा सामना करताना भारतानं महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचं ते म्हणाले.
हिंदू भगिनींकडून २ एकर जमीन नमाज पठणासाठी दान, वडिलांची इच्छा पूर्ण करत सलोखा जपला
करोना संसर्गाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. भारतानं करोना संकटात निर्णायक भूमिका बजावली आहे. भारतानं मेड इन इंडिया करोना प्रतिबंधक लस बनवली नसती तर या संकटात जगाचं काय झालं असतं, असा सवाल मोदींनी केला. या संकटाच्या काळात भारतानं संपूर्ण जगाला करोना लस आणि औषधं पुरवली, असं मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाबद्दल अनिवासी भारतीयांना संबोधन केलं. भारत डिजीटल मध्ये इतकी प्रगती करेल,अशी अपेक्षा करण्यात आली नव्हती. आमच्या सरकारनं विचार करण्याची पद्धत बददली. स्टार्टअपमध्ये सुरुवातीला जगभरात भारताचा कोण विचार करत नव्हतं. मात्र, आता यूनिकॉर्नच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं मोदी म्हणाले.

डेन्मार्कमध्ये वास्तव्यास असलेल्या अनिवासी भारतीयांनी त्यांच्या इतर देशातील पाच मित्रांना भारतामध्ये पर्यटनासाठी पाठवण्याचं आवाहन मोदींनी केलं. भारत सध्या पर्यावरण सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. जग संकटात येईल, अशी भूमिका भारत घेणार नाही, असं देखील मोदी म्हणाले. भारतात झाडांमध्ये, नद्यांमध्ये ईश्वराचं अस्तित्त्व असल्याचं मानलं जातं असल्याचं देखील मोदींनी सांगितलं आहे.
MNS: नवी मुंबईत मनसैनिक आक्रमक, मशिदीसमोर हनुमान चालीसा पठण, पोलिसांकडून अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि यूक्रेन यांनी त्यांच्यातील समस्या चर्चेद्वारे सोडवावी आणि युद्ध थांबवावं, अशी भूमिका माडंली. तर, डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत रशियावर टीका केली. भारत नक्कीच रशियाला युद्ध थांबवण्याबाबत आणि राजनैतिक चर्चेतून प्रश्न सोडवण्याबद्दल प्रभावित करेल, असं मेटे फ्रेडरिक्सन यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांनी ९ करारांवर स्वाक्षरी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूरोप दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. नरेंद्र मोदी आज फ्रान्सच्या दौऱ्यावर जातील. फ्रान्समध्ये नुकतेच पुन्हा एकदा राष्ट्रपती झालेल्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी ते चर्चा करतील आणि फ्रान्समधून ते भारताकडे रवाना होणार आहेत.

नवी मुंबई भल्या पहाटेच हनुमान चालिसा वाजली; मनसैनिकांची धरपकड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here