मुंबई : फॅशन विश्वातील सर्वात मोठा मेट गाला २०२२ न्यूयॉर्कमध्ये २ मेपासून सुरू झाला आहे. या कार्यक्रमात फॅशन विश्वातील एकाहून एक सरस कलाकार सहभागी झालेले होते. हे सर्व कलाकार कार्यक्रमात वेगवेगळ्या फॅशनचे कपडे घालून आले होते. या सगळ्यामध्ये सर्वात जास्त भाव खाऊन गेली ती किम कर्दशियन. मेट गाला २०२२ मध्ये किम कर्दशियन तिच्या बॉयफ्रेंडबरोबर सहभागी झाली होती. यावेळी किम ग्लॅमरस तर दिसत होती शिवाय तिच्या कमी झालेल्या वजनाचीही जोरदार चर्चा होती. अवघ्या तीन आठवड्यांमध्ये किम कर्दशियनं वजन कमी केलं आहे.

Throuple Relationship- सायशाचे एकाच कपलसोबत होते शारीरिक संबंध

किमनं मेट गाला मध्ये मर्लिन मन्रो हिचा लुक रिक्रिएट केला होता. मर्लिनचा लुक घेण्यासाठी तिला जो गाऊन घालायचा होता त्यासाठी किमला खूप मेहनत घेतली. कारण अवघ्या तीन आठवड्यांमध्ये किमनं तिचं साडेसात किलो वजन कमी केलं.

किम मर्लिन मन्रोच्या लुकमध्ये

मेट गाला २०२२मध्ये किमनं जो गाउन घातला होता त्यामुळे मर्लिन मन्रोची आठवण सर्वांना आली. मर्लिननं अशा स्टाईलचा गाउन १९ मे १९६२ मध्ये स्क्वायर गार्डनमध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी घातला होता. त्यानंतर तीन महिन्यांनी मर्लिनचं निधन झालं. आता किमनं मर्लिनचा हा गाउन पुन्हा एकदा घालत तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मिट गाला २०२२ मध्ये किमनं जो गाउन घातला होता त्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. तो गाउन तिला सूट होत होता. किमनं या गाउनबरोबर पांढऱ्या रंगाचा फर कोट कॅरी केला होता. ब्लॉन्ड हेअरकलर करत स्लीक बन शेप हेअरस्टाईल केली होती. यावर किमनं १८ के व्हाईट गोल्डमधील हिऱ्याचं कानातलं घातलं होतं.


किमनं इन्स्टाग्रामवर या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ‘मी मर्लिन मन्रोसारखा आयकॉनिक ड्रेस घालून स्वतःला फार भाग्यशाली मानत आहे. या स्टनिंग स्किनटाईट गाउन Jean Louis नं डिझाईन केला आहे. या गाउनला त्यानं सहा हजार क्रिस्ट्ल्सपासून बनवला आहे.’ काही रिपोर्ट्सनुसार या ड्रेसची किंमत ४.८ मिलियन डॉलर म्हणजे ३६. ४८ कोटी रुपये इतका आहे.

PHOTOS: अभिनेत्री दिशा पाटनी पुन्हा चर्चेत, कारण ठरलं…

किमनं वजन कमी केल्यानंतर तिचा व्हिलॉग केला आहे. त्यात तिनं सांगितलं आहे की, ‘गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गाला झाल्यानंतर मला कल्पना सुचली. मी Balenciagaचा लूक घेतला नाही तर मी अमेरिकन थीम कशी पूर्ण करणार. त्यामुळे मर्लिन मन्रोशिवाय सर्नोत्तम अमेरिकन थीम असूच शकत नाही. त्यामुळे मी हा ड्रेस घालण्याचा निर्णय घेतला.’


किमनं तीन आठवड्यांत तिचं साडेसात किलोनं वजन कमी केलं आहे. किमनं तिचं वजन कसं कमी केलं याबाबतही सांगितलं आहे. किमनं सांगितलं की, ‘मी दिवसातून दोन वेळा सॉना सूट घालत होती. ट्रेडमिलवर धावत होते. साखर आणि कार्ब्ज खाणं सोडून दिलं होतं. केवळ भाज्या आणि प्रोटीनचं सेवन करत होते. मी उपाशी राहिले नाही परंतु मी डाएटचं काटोकोरपणं पालन केलं आहे.’


या कठोर डाएटनंतर जेव्हा किमनं हा ड्रेस घातला तेव्हा तो तिला फिट झाला. त्यावेळी किमचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यावेळच्या भावना मांडताना किमनं सांगितलं की, ‘मला त्यावेळी आनंदानं रडायला येत होतं…’ मेट गाला २०२२ मध्ये किम तिचा बॉयफ्रेंड पीट डेविडसनबरोबर सहभागी झाली होती. मेट गालामध्ये २०२२ मध्ये किम सहभागी झाली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here