राजद्रोहाच्या गुन्ह्यात तुरुंगात असणाऱ्या नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर आज कोर्टाकडून निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील आदेश अद्याप तयार नसल्याने बुधवारी सकाळी याबाबतचा निकाल जाहीर करू, असं न्यायालयाने याआधी स्पष्ट केलं होतं. मात्र आता नवनीत राणा यांची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, २ मे रोजीही नवनीत राणा यांची तब्येत बिघडली होती. नवनीत राणा यांना तुरुंग प्रशासनाकडून योग्य औषधोपचार दिले जात नसल्याचा आरोप तेव्हा राणा यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता.