मुंबई: छोट्या पडद्यावरची एखादी मालिका इतकी गाजते की, प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते. पण या मालिकेतील कलाकारांचं आयुष्य देखील तितकंच बदलं. अनेकदा आयुष्यभराची नवीन नाती या मालिकांच्या सेटवर जोडली जातात. मालिकेत काम करत असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या अनेक लव्हस्टोरी सिनेसृष्टीनं पाहिल्यात.यात आता अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यां जोडीचं नाव जोडलं जाणार आहे.

तुझ्यात जीव रंगला‘ मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं. मालिकेचं कथानक, कलाकार असो किंवा कोल्हापुरातल्या गावात झालेलं शूटिंग. सगळंच प्रेक्षकांना आपलंस वाटलं होतं. त्यामुळं मालिकेनं अनेक वर्ष आपली जादू कायम ठेवली. मालिकेनं आता निरोप घेतला असला तरी, राणा दा आणि पाठक बाईंची क्रेझ कमी झाली नाहीए. इतकंच नव्हे तर आता त्यांच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट देखील मिळालंय. ते म्हणजे राणाजी आणि पाठक बाई खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे झाले आहेत. नुकतेच दोघांच्या साखरपुड्याचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.

अक्षया आणि हार्दिक यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली ती ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या सेटवरचं. मालिका सुरू झाली तेव्हा दोघांच्या खासगी आयुष्याबद्दलही बोललं गेलं. अक्षयाच्या आयुष्यात तेव्हा हार्दिक नव्हता. एका अभिनेत्यासोबत ती नात्यात होती. परंतु काही कारणांमुळं दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अक्षयाच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. पण हार्दिक मात्र सिंगल असल्याचं सांगत होता. अक्षय आणि हार्दिक यांच्या खात नात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण दोघांनीही कधीही याला दुजोरा दिला नाही.
तुझ्यात जीव रंगला ! अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा पार पडला साखरपुडा


गेल्या काही दिवसांपासून अक्षया आणि हार्दिक यांच्यात सोशल मीडियावरचा संवाद वाढला होता. एकमेकांच्या फोटोवर कमेंट करणं वैगरे वाढलं होतं. दोघांचे एकत्र फोटोशूट देखील वाढले होते. त्यावरून चाहते काय अंदाज लावायचा तो लावत होते. परंतु दोघांनी कधीही याबद्दल स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. एकदा अक्षया आणि हार्दिक यांनी काही हटके फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये त्यांचा स्टायलिश अंदाजही पाहायला मिळतोय. फोटोंमधील दोघांची केमेस्ट्रीही चाहत्यांना आवडली होती. पण चर्चा सुरू आहे ती, अक्षयानं हार्दिकच्या फोटो आणि व्हिडिओवर केलेल्या कमेंटची. अक्षयानं हार्दिकच्या फोटोंवर हार्ट इमोजी( ❤️)अशी कमेंट केली होती. त्यामुळं चर्चेला उधाण आलं होतं. अक्षयच्या बर्थडेला देखील हार्दिकनं खास पोस्टकरत शुभेच्छा दिल्या होत्या.
जिथे तू असावे तिथे मी असावे! विराजस-शिवानी अडकले विवाहबंधनात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here