गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी येथील तलावाशेजारी फिडरवरील बालासाहेब मुंढे यांच्या शेताच्या बाजूला अनाधिकृत रोहित्र बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती गंगाखेड येथील महावितरणच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यावरुन अभियंता कैलास फड व इतर अभियंत्यांनी मरगळवाडी तलाव गाठले. यावेळी बालासाहेब मुंढे यांच्या शेतासमोर १०० के.व्ही.चे रोहित्र व जुनी पेटी बसविण्याचे काम सुरु होते. अधिकार्यांनी या संदर्भात काम करणार्यांना विचारणा केली असता सदरील रोहित्राचे काम पिंटु कातकडे या कंत्राटदारामार्फत केले जात असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि ते चक्रावले त्यांनी तात्काळ काम बंद करण्याच्या सूचना संबधीतांना दिल्या. या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या समोर घडलेल्या प्रकाराचा पंचनामा करण्यात आला आहे. एकीकडे विद्युत रोहित्रासाठी महिना-महिना वाट पहावी लागत असताना गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी येथे अनाधिकृत रोहित्र बसविण्याचा प्रकार कंत्राटदार पिंटू कातकडे यांनी केला असल्याने संबधीतावर आता महावितरणकडून गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
गंगाखेड पोलिसांची टाळाटाळ…
मरगळवाडी येथे अनाधिकृत रोहित्र बसविण्याच्या कामाचा पंचनामा केल्यानंतर या संदर्भात गंगाखेड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. मात्र, गंगाखेड पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या अधिकार्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची माहिती महावितरणच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Flipkart ची धमाकेदार ऑफर, निम्म्या किंमतीत मिळतायत ‘हे’ शानदार स्मार्ट टीव्ही; पाहा डिटेल्स
अडचणीत होणार वाढ…
कंत्राटदार पिंटू कातकडे यांनी अनाधिकृत रोहित्र बसविण्याचा प्रकार केला असल्यामुळे त्यांअनधिकृत रोहित्र बसवण्याचा प्रयत्न शेतकऱ्याने हाणून पाडला, कंत्राटदाराविरोधात कारवाई होणारच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे संबधीत कंत्राटदाराच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. सद्यस्थितीला महावितरण कार्यालयात पिंटू कातकडे या कंत्राटदाराच्या वेगवेगळ्या किस्यांची चर्चा सुरु आहे.