मुंबई: महाराष्ट्रातील करोना साथीच्या प्रादुर्भावाची सद्यस्थिती लक्षात घेऊन राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असून यास राज्यातील जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री यांनी केले आहे. ३० एप्रिपर्यंतचा लॉकडाऊन यशस्वी झाल्यास त्यानंतर लॉकडाऊन वाढवावा लागणार नाही, असे महत्त्वाचे विधानही अजित पवार यांनी केले.

करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रसार रोखण्यासाठी राज्यातली टाळेबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे नमूद करत नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य द्यावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राज्याच्या काही भागांत करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं सापडत आहेत. तिथला संसर्ग रोखण्यासाठी संबंधित गावे, वाड्या, वस्त्या, सोसायट्या सील केल्या जात आहेत. यामुळे सध्या गैरसोय होत असली तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

आपला व आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन वाढवला आहे. लोकहितासाठी घेतलेल्या या निर्णयाला राज्यातील जनतेनं सहकार्य करावं. प्रत्येकानं घरातच थांबावं. डॉक्टर, पोलीस, शासकीय यंत्रणांना सहकार्य करावं. हे लॉकडाऊन यशस्वी झाले तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन वाढवावा लागणार नाही, याचा विचार करून राज्यातल्या प्रत्येकानेच करानावर मात करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांनी ‘ईस्टर संडे’निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. भगवान येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा हा दिवस आपल्या जीवनात आनंद घेऊन येईल. मानवतेच्या सेवेसाठी प्रेरीत करेल, असे नमूद करताना करोनाच्या संकटामुळे ‘ईस्टर संडे’ची प्रार्थना आपापल्या घरात करावी, कुणीही घराबाहेर पडू नये, घरात रहा, सुरक्षित रहा, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here