धुळे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर धुळ्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, धुळे पोलिसांनी वेळीच या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडून दडपशाही होत असून मनसेचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
नंदुरबार जिल्ह्यात हनुमान चालीसा पठण…
नंदुरबार मनसे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांसदर्भात दिलेला अल्टिमेटम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नंदुरबार शहरातील धुळे नाका परिसरातील निंबाच्या झाडात साकारलेल्या हनुमान मंदिर जवळ हनुमान चालीसाचे पठाण केले. सदर परिसर अवलगाजी दर्गा जवळ आहे.