जळगाव : जळगावात एका प्रौढाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मजुरीचे पैसे मिळाले, पैसे घरी देवून बेपत्ता असलेल्या प्रौढाचा जळगाव शहरातील जे.के.पार्क परिसरातील एका बंद पडलेल्या जलतरण तलावात मृतदेह आढळून आला. नेमका या प्रौढासोबत घातपात झाला की त्याने आत्महत्या केली, हे कळू शकलेले नाही. रोहिदास मोतीलाल निकुंभ (वय ५२ रा. तांबापूरा) जळगाव असे मयताचे नाव आहे.

जुन्या जलतरण तलावात मृतदेह तरंगतांना आढळला…

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास निकुंभ हे तांबापूरा येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून मजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. रविवारी १ मे रोजी त्यांना मजूरीचे पैसे मिळाले होते. पैसे घरी दिल्यानंतर ते सायंकाळी ५ वाजता बाहेर गेले. रात्री उशीरापर्यंत परतले नाही. दुसऱ्या दिवशी सोमवार २ मे रोजी सकाळी ११ वाजता जे.के. पार्क येथील बंद पडलेल्या जुन्या जलतरण तलावात त्याचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.

भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचाही गळा घोटला, राऊतांचं राज ठाकरेंवर टीकास्त्र
पुढील तपास पोलीस करत आहेत…

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गणेश शिरसाळे व राहुल रगडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर जलतरण तलावातून मृतदेह बाहेर काढून जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आला. या परिसरात मयताची ओळख पटविली असता मयत तांबापूरा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. यानंतर कुटूंबियांना घटनेची माहिती देण्यात आली. जिल्हा रूग्णालयात कुटूंबियांनी येवून ओळख पटविली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास गणेश शिरसाळे करीत आहेत.

रोहित शर्माच्या टीम इंडियाला मोठा झटका; पाच वर्षाची हुकुमत संपुष्टात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here