अर्पिता आणि आयुषने ३ मेच्या रात्री घरी ईदची पार्टी दिली. या सेलिब्रेशनचा कंगना आणि कियाराचा एक व्हिडिओ समोर आला. यात दोघी पोज देत आहेत आणि कियारा म्हणतेय, २० तारखेला दोन्ही सिनेमे पाहायला जा. कंगना खूप खूश दिसतेय. हा व्हिडिओ रात्री ११.२६ वाजता पोस्ट केला होता. तो पुन्हा डिलीट केला.
Video : ब्रेकअपनंतरही कियारा-सिद्धार्थ सोबत आले ईद पार्टीला
व्हिडिओ काढून टाकण्याचं कारण
असं म्हणतात की सलमान खानच्या पार्टीत कंगनाला पाहून लोकांनी राग व्यक्त केला. कंगना नेहमीच बाॅलिवूडवर टीका करत असते. हा व्हिडिओ पाहून लोकांनी कंगनाला ट्रोल केलं. ते म्हणाले, ही सरड्यासारखे रंग बदलते. म्हणून कदाचित कंगनाबरोबरचा व्हिडिओ कियारानं डिलीट केला.
‘मेहनती आहे पण काय करेल, कसं करेल..’ इब्राहिमच्या करिअरची सैफला चिंता

विषय इथेच संपला असता. पण तसं न होता कियारानं पुन्हा सकाळी कंगनाला टॅग करत तोच व्हिडिओ शेअर केला. यामुळेच सगळ्यांना नवल वाटलं.