मुंबई: बॉलिवूड म्हटलं की अनेक गोष्टी चर्चेत येत असतात. दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा येणारा नवा सिनेमा आणि त्याच्याकडून सर्वांना दिली जाणारी ईद पार्टी हे समीकरणच आहे. मात्र यंदाची ईद सलमानच्या सिनेमाशिवायच साजरी झाली. पण यावर्षीची ईदची पार्टी सलमानने नव्हे तर त्याची बहीण अर्पिता आणि मेहुणा आयुष शर्मा यांनी दिली. या पार्टीला जवळपास अख्खं बॉलिवूड हजर होतं. अर्पिता आणि आयुषच्या खार येथील नव्या आलिशान घरात आयोजित केलेल्या या पार्टीत काही खास गोष्टीही घडल्या. त्यातून सलमान आणि करिश्मा या ९० च्या दशकातील हिट जोडीच्या लग्नाची चर्चाही रंगली.

सलमान खानच्या पार्टीत कियाराने कंगनासोबतचा Video टाकला, डिलीट केला, परत टाकला; पण असं का?

करिश्मा सलमान

ईद पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटींनी धमाल केली. यंदा या पार्टीचा निमंत्रक सलमान नसला तरी येणाऱ्या प्रत्येकाचं तो स्वागत करत होता. कंगना रणौत, शहनाज गिल यांच्यापासून ते अगदी नुकतचं ब्रेकअप झालेले कियारा आडवाणी आणि सिध्दार्थ मल्होत्रा ही जोडीही आली होती. सेलिब्रिटींच्या या मांदियाळीत बॉलिवूडची लोलो म्हणजेच करिश्मा कपूरनेही लक्ष वेधून घेतलं. ईद मुबारक म्हणत करिश्माने सलमानला छान अलिंगन दिलं. याच पार्टीतला एक फोटो करिश्मा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या फोटोत सलमान आणि करिश्माला झालेला आनंद ओसंडून वाहत आहे. माय बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर, बॅक वुईथ ओजी.. सभी को ईद मुबारक अशी कॅप्शन लिहून करिश्माने हा फोटो शेअर केला आहे. करिश्माने या पार्टीत खूप धमाल केली.


९० च्या दशकात कॉमेडी रोमँटिक सिनेमांचा ट्रेंड आला होता. त्याकाळात सलमान आणि करिश्मा यांनी एकमेकांसोबत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. यामध्ये जीत, अंदाज अपना अपना, बीवी नंबर वन, दुल्हन हम ले जाएंगे या सिनेमात या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली. ईद पार्टीच्या निमित्ताने भेटलेल्या जोडीला पाहून चाहत्यांच्या मनात सलमान आणि करिश्माच्या लग्नाचा विचार आला.

करिश्मा कपूर, सलमान खान

सलमानचं अजून लग्न झालेलं नाही. तर करिश्माने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी लग्न करावं, अशी कमेंट नेटकऱ्यांनी या फोटोवर केली आहे. तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसता अशी एका चाहत्याने कमेंट केली आहे. तर एकाने असं म्हटलं आहे की पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही तुमची केमिस्ट्री छान आहे.

Video : ब्रेकअपनंतरही कियारा-सिद्धार्थ सोबत आले ईद पार्टीला, एकत्र पोज देण्याचं मात्र नाकारलं

करिश्मा सलमान

काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नात आलियाच्या चुड्यातील कलीरा करिश्माच्या डोक्यावर पडला होता. तेव्हापासून करिश्माच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. त्यातच ईद पार्टीत सलमानसोबत आनंदी फोटो पाहून केलेल्या कमेंटने करिश्माच्या लग्नाच्या चर्चेला खतपाणी मिळालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here