मुंबई : जगातले सगळे प्रश्न संपतील पण अभिनेता सलमान खानने लग्न का केलं नाही हा प्रश्न कायम राहील, असे मीम्स सोशल मीडियात नेहमीच व्हायरल होत असतात. खरोखरच बॉलिवूडच्या खान परंपरेतील लोकप्रिय अभिनेता सलमान खान हा आज ५६ व्या वर्षीही सिंगल आहे. त्याच्या आयुष्यात सोमी अलीपासून ते कतरिन कैफपर्यंत अनेक मुली आल्या. त्यांच्यासोबत त्याचं नाव जोडलं गेलं. मग असं काही कारण होतं की सलमानची रिलेशनशिप लग्नापर्यंत पोहोचण्याआधीच तुटते? या प्रश्नाचं उत्तर त्याचे वडील आणि लेखक सलीम खान यांनीच दिलं आहे. सलीम यांचं उत्तर ऐकून सलमानचे चाहतेही बुचकळ्यात पडले आहेत.

सलीम खान सलमान खान

सलमान खान याच्या आयुष्यात सोमी अलीच्या रूपाने पहिली गर्लफ्रेंड आली. तिच्यासोबतच्या नात्यात तो खूप पुढे गेला होता. पण त्यांचं ब्रेकअप झालं. संगीत बिजलानीसोबत तर तो लग्नही करणार होता. त्या दोघांच्या लग्नाची पत्रिकाही छापल्या होत्या. पण बोहल्यावर चढण्याआधीच त्यांचे मार्ग वेगळे झाले. ऐश्वर्या रायसोबत झालेलं भांडण हे तर साऱ्या जगाला माहिती आहे. कतरिना कैफला तर सलमानने बॉलिवूडमध्ये आणि आपल्या आयुष्यात खास स्थान दिलं, पण तिच्यासोबतही फक्त त्याची गाडी अफेअरपर्यंतच गेली.

आता चाहत्यांना हवंय सलमान-करिश्माचं लग्न, फोटो पाहून दिल्या भन्नाट शुभेच्छा

पडद्यावर रोमान्स करणारा सलमान प्रत्यक्ष आयुष्यात एक बायको मिळवू शकत नाही का हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावत असतो. सलमानने त्याच्या अफेअर्सबद्दल कॉफी वुइथ करण या शोमध्येही दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. पण सलमानच्या आयुष्यात गर्लफ्रेंड का टिकत नाही याचं एक खास कारण आहे आणि तेच कारण सलीम खान यांनी सांगितलं.


सलीम खान फराह खानच्या तेरे मेरे बीचमे या शोमध्ये बोलताना त्यांनी सलमानच्या एका अशा सवयीविषयी सांगितलं की ज्यामुळेच त्याची गर्लफ्रेंड बायको बनत नाही. सलीम म्हणाले, जेव्हा त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी येते. तिच्याशी त्याची जवळीक वाढते आणि गोष्टी रिलेशनशिपपर्यंत जातात तेव्हा ती गर्लफ्रेंड सोडून सलमानच्या मनात दुसऱ्याच स्त्रीचे विचार सुरू होतात. आणि ती दुसरी स्त्री म्हणजे सलमानची आई. सलमान त्याच्या प्रत्येक गर्लफ्रेंडमध्ये आईला बघतो आणि हेच त्या मुलींना आवडत नाही. या कारणाने त्याला गर्लफ्रेंड सोडून जाते.

आई कुठे काय करते : संजना करते आत्महत्येचा प्रयत्न, देशमुख कुटुंबात मोठा गहजब

सलमान आणि सलीम खान

१८ नोव्हेंबर १९९९ ला सलमानच्या लग्नाचा मुहूर्तही ठरला होता, असा खुलासाही सलीम यांनी केला. याच तारखेला सलीम खान यांचंही लग्न झालं आहे. सलमान म्हणाला एका मुलीशी त्याला लग्न करायचं आहे. साजिद नाडियादवाला आणि सलमान यांनी ठरवलं होतं की लग्न करायचं. पण लग्नाच्या आदल्या दिवशी सलमानने त्याचा मूड नाही असं सांगून लग्न थांबवलं. साजिदने ठरल्याप्रमाणे लग्नं केलं. सलमान मात्र आजही अविवाहित आहे. सलीम यांनीच हे कारण सांगितल्याने चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर ईदच्या पार्टीत करिश्मा कपूरसोबत त्याची केमिस्ट्री पाहून आता तरी सलमानने लग्नाचा विचार करावा असं त्याचे चाहते म्हणत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here