ठाण्यातील वकील आदित्य मिश्रा यांनी संभाजी भिडे यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचे सांगत त्यातून यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आयोगाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव दंगल प्रत्यक्ष संबंध आढळून येत नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचं नाव खटल्यातून वगळण्यात आल्याचं लेखी अहवाल दिला आहे.

pune rural police excluded sambhaji bhides name from the koregaon bhima riot case
मोठी बातमी; कोरेगाव भीमा दंगलीच्या खटल्यातून संभाजी भिडेंचे नाव वगळले

हायलाइट्स:

  • संभाजी भिडे यांचे नाव कोरेगाव भीमा दंगलीच्या खटल्यातून वगळले.
  • पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला दिली माहिती.
  • या दंगलीमध्ये भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली होती.
पुणे: ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान’चे संस्थापक संभाजी भिडे यांचे नाव कोरेगाव भीमा दंगलीच्या खटल्यातून वगळण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला दिली आहे. या दंगलीमध्ये संभाजी भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात एकूण २२ गुन्हे दाखल असून ४१ आरोपींवर वर्षभर पूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये संभाजी भिडे यांचे नाव नसल्याची माहिती पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगा समोर असलेल्या सुनावणीदरम्यान दिले आहेत. (pune rural police excluded sambhaji bhides name from the koregaon bhima riot case)

ठाण्यातील वकील आदित्य मिश्रा यांनी संभाजी भिडे यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचे सांगत त्यातून यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आयोगाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव दंगल प्रत्यक्ष संबंध आढळून येत नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचं नाव खटल्यातून वगळण्यात आल्याचं लेखी अहवाल दिला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : pune rural police excluded sambhaji bhides name from the koregaon bhima riot case
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here