नागपूर: शुक्रवारी नागपुरात आणखी दोन रुग्णांची भर पडली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधितांचा एकूण आकडा २७वर गेला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये आजच्या घडीला ८३ करोना सदृष्य रुग्ण भरती असून या सर्वांचे अहवाल आल्यानंतरच जिल्ह्यातील करोनाबाधितांचे चित्र स्पष्ट होईल. एका रुग्णाचा मृत्यू झाला; मात्र ८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. उर्वरित १९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

११ मार्च रोजी दोहामार्गे अमेरिकेतून प्रवास करून नागपुरात आलेल्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील एका अभियंत्याला करोनाची लागण झाल्याची पहिली नोंद करण्यात आली होती. पहिला रुग्ण सापडून महिना पूर्ण झाला. या महिनाभरात २७ जणांना करोनाची लागण झाल्याचे पुढे आले. आठजण बरे झाले असल्याने त्यांना घरी १४ दिवस विलगीकरणासाठी पाठविण्यात आले आहे. आजच्या घडीला शासकीय रुग्णालयात १९ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ११ एप्रिल रोजी ५८ संशयित रुग्ण असल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे एकूण संशयितांचा आकडा १,२११पर्यंत पोहोचला. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) येथे ४८ आणि मेयो येथे ३५ असे एकूण ८३ करोना सदृष्य रुग्ण भरती आहेत. या सर्वांचे अहवाल आल्यानंतर नागपुरातील करोनाचे चित्र स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आतापर्यंतची जिल्ह्यातील स्थिती

एकूण संशयीत : १,२११

सध्या भरती असलेले संशयीत : ८३

आतापर्यंतचे पॉझिटिव्ह : २७

बहे होऊन घरी गेलेले : ८

तपासणी केलेले नमुने : १,२७८

घरी पाठविलेले संशयीत : ९०१

विलगीकरण कक्षातील संशयीत : ६३७

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here