नवी दिल्ली : देशात २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये मृत्यूंची नोंद वाढली असली तरी त्याला फक्त करोना कारणीभूत नाही, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. वेगवेगळ्या संस्थांकडून करोना साथीमुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा वाढवून सांगितला जात असून हे थांबले पाहिजे, असे ते म्हणाले. (Corona Virus In India)

भारतात या काळात करोनाने ४ लाख ८९ हजार मृत्यू झाल्याचा दावा लॅन्सेट मासिकामध्ये सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधामध्ये करण्यात आला आहे. करोनामुळे आत्तापर्यंत ४० लाख ७० हजार मृत्यू ओढावले असून जगभरात हा आकडा सर्वाधिक असल्याचे त्यात म्हटले होते. जन्म-मृत्यूवर आधारित नोंदणीकृत अहवाल सरकारने मंगळवारी सादर केला. २०१९मध्ये देशात ७६.४ लाख मृत्यूंची नोंद झाली होती. तर २०२०मध्ये त्यात ६.२ टक्क्यांनी वाढ होऊ मृत्यूंची संख्या ८१.२ लाख झाली. २०१९च्या तुलनेमध्ये २०२०मध्ये ४.७५ लाख मृत्यू अधिक झाले. तर २०१९ची तुलना केल्यास २०१९मध्ये ६.९ लाख अतिरिक्त मृत्यू झाले होते. देशात विविध कारणांनी झालेल्या मृत्यूंची ही एकत्रित आकडेवारी असून त्याचे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून अनुमान काढणे योग्य नाही, असे पॉल यांनी म्हटले आहे.

‘निवडणुका जाहीर करा’, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; ‘निवडणुका १५ दिवसांत जाहीर होणे कठीण’

३२०५ नवे करोनाबाधित

देशात बुधवारी ३,२०५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या १९,५०९वर पोहोचली आहे. तर आजवरच्या एकूण बाधितांची संख्या ४,३०,८८,११८ झाली आहे. २४ तासांत ३१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यातील २९ मृत्यू हे केवळ केरळमध्ये झाले आहेत. आजवर ५ लाख २३ हजार ९२० जणांनी करोनामुळे जीव गमावला आहे. एकूण बाधितांच्या तुलनेमध्ये उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण ०.०५ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.७४ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here