Vasant More | मनसेने राज्यभरातील मशिदींवरील भोंग्याविरोधात आंदोलन छेडले असताना वसंत मोरे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला निघून गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांन उधाण आले होते.

 

Vasant More Raj Thackeray
Vasant More | राज्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी मनसेकडून आक्रमक आंदोलन करण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेतली.

हायलाइट्स:

  • साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो
  • माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार
पुणे: मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत मशिदींवरील भोंग्यांवरून अजान होणे बंद होणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार, अशी ठाम भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरु आहे. आतापर्यंत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या सगळ्या धामधुमीत पुण्यातील मनसेचा प्रमुख चेहरा असलेले वसंत मोरे (Vasant More) हे गायब आहेत. मनसेच्या आंदोलनाची सुरुवात होण्यापूर्वीच ते बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपतीला निघून गेले होते. राज्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी मनसेकडून आक्रमक आंदोलन करण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेतली.

या सगळ्या घडामोडींनंतर वसंत मोरे यांनी रात्री उशीरा फेसबुकवर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये वसंत मोरे नव्या लूकमध्ये दिसत आहेत. वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय,साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आणि आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले. म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार, असे वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
Vasant More: वसंत मोरे ‘राज’आज्ञा मोडणार ?, राज्यात वातावरण तापलेलं असताना तिरुपती बालाजीला रवाना
वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचा प्रमुख चेहरा आहे. मात्र, मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर वसंत मोरे यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेटही घेतली होती. राज ठाकरे यांच्या भेटीवर या वादावर पडदा पडला, असे सांगितले जात होते. मात्र, राज ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या पुणे दौऱ्यातही वसंत मोरे काही कारणास्तव फारसे दिसून आले नव्हते. त्यानंतर आता मनसेने पुकारलेले आंदोलन ऐन भरात असताना वसंत मोरे राज्याबाहेर निघून गेल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mns leader vasant more new look and facebook post create buzz in political field
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here