औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यापाठोपाठ आता औरंगाबादमध्ये लवकरच एमआयएमची सभा होणार आहे. एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात सुतोवाच केले. मनसे आणि शिवसेनेला सभेसाठी परवानगी मिळत असेल तर मग आमच्यावर प्रतिबंध आहेत का? आम्हीदेखील औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर भव्य सभा घेऊ, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले. त्यामुळे आता एमआयम या सभेसाठी नेमका कोणता मुहूर्त निवडणार, हे पाहावे लागेल.

यापूर्वी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेला पोलिसांनी सुरुवातीला परवानगी नाकारली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पोलिसांनी अटी-शर्तींसह या सभेला परवानगी दिली होती. मात्र, राज ठाकरे यांच्या सभेत बहुतांशी नियमांचे उल्लंघन झाले होते. याप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला असून आता त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.तर दुसरीकडे मनसेच्या सभेनंतर त्याच मैदानावर ८ जूनला शिवसेनेची सभा होणार आहे. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत ८ जून १९८५ रोजी स्थापन झाली. या शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात, हे पाहावे लागले.

औरंगाबादमध्ये मनसेच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरु होणार

मनसेने मशिदींवरील भोंग्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून औरंगाबादमधून प्रारंभ होणार आहे.मशिदींवरील भोंग्यांचा आवाज होताच १०० क्रमांकावर कॉल करा, असे आवाहन मनसेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

वसंत मोरेंचा नवा लूक, नवी भूमिका; थेट तिरुपतीतून केलेल्या फेसबुक पोस्टने चर्चांना उधाण
मात्र, शिवसेना आणि मनसेच्या सभेप्रमाणे औरंगाबाद पोलीस एमआयएमच्या सभेला परवानगी देणार का, हेदेखील पाहावे लागेल. एमआयमच्या या सभेला परवानगी मिळाल्यास पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी याठिकाणी येण्याची शक्यता आहे. यावेळी ते मशिदींवरील भोंगे हटवण्यासंदर्भात काय भूमिका घेतात, ते पाहावे लागेल. या सभेमुळे औरंगाबादमधील राजकी वातावरण तापण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंच्या सभेची उत्सुकता

भाजपने शिवसेना व पर्यायाने महाविकास आघाडीच्या विरोधात घेतलेला पवित्रा आणि मनसेने हिंदुत्वाच्या मुद्यावर सुरु केलेले राजकारण याला शिवसेनेकडून जशासतसे उत्तर दिले गेले पाहिजे अशी भावना शिवसेनेच्या नेते-पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त होत होती. निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीला सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरसावल्याचे चित्र आहे. त्यांनी नेते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु केल्या आहेत. १४ मे रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा मुंबईत बीकेसीवर होणार आहे. त्यानंतर ८ जून रोजी दुसरी सभा औरंगाबादेत आयोजित केली जाणार आहे.औरंगाबादच्या सभेची घोषणा झाल्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल, असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here