दिल्लीतील तबलीघी जमात मरकझच्या कार्यक्रमात सहभागी झालेले काही तबलीघी दोन मशिदींमध्ये लपल्याची माहिती ३१ मार्चला पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्यांना शोधून काढलं. यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर आता त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पासपोर्ट आणि व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विदेशी नागरिकांना पोलिसांनी चौकशीसाठी वेगळं ठेवलं आहे, अशी माहिती बहराईचचे पोलीस अधीक्षक विपीन कुमार मिश्रा यांनी दिली. दिल्लीतील मरकझमधून परतल्याची माहिती लपवल्या प्रकरणी सर्व २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं मिश्रा यांनी सांगितलं.
दिल्लीतील निझामुद्दीनमध्ये तबलीघी जमात मरकझचा गेल्या महिन्यात धार्मिक कार्यक्रम झाला. मरकझचा हा परिसरत करोना व्हायरसचा हॉटस्पॉट बनला. मरकझमधील अनेक तबलीघींना करोनाचा संसर्ग झाला होता. हे तबलीघी देशातील विविध भागांमध्ये परतल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या अनेकांना करोनाची लागण झालीय.
दरम्यान, देशातील करोना रुग्णांची संख्या ७५२९ इतकी झाली आहे. तर करोनाने २४२ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना झालेले ६५२ जण बरे झालेत. त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times