प्रशांत किशोर यांनी गेल्या तीन दशकांपासून बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांची सत्ता होती, असं म्हटलं. पहिल्या १५ वर्षात लालूप्रसाद यादव आणि दुसऱ्या १५ वर्षांमध्ये नितीश कुमार यांची सत्ता आहे. लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या समर्थकांनी सामाजिक न्यायाला प्राधान्य देत सरकार चालवलं. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास व्यक्तींच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. तर, नितीश कुमार यांचे समर्थक आमच्या काळात आर्थिक विकास आणि सामाजिक प्रश्नांवर काम झाल्याचं म्हणतात, असं प्रशांत किशोर म्हणाले.
लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार समर्थकांच्या दाव्यात तथ्य असलं तरी बिहार गेल्या ३० वर्षांपासून देशातील सर्वात मागास राज्य राहिलं आहे. विकासाच्या मापदंडावर बिहार मागं राहिला आहे. गेल्या १५ वर्षातील बिहारमधील प्रगतीचा वेग बघितला तर आपण याद्वारे विकासाच्या मार्गावर जाऊ शकत नाही. देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये बिहारचा समावेश व्हायचा असल्यास राज्याला नव्या विचाराची, नव्या प्रयत्नाची गरज असल्याचं प्रशांत किशोर म्हणाले.
बिहारच्या विकासासाठी नवा विचार करण्याची क्षमता एका व्यक्तीकडे आहे. बिहारच्या जनतेनं त्या व्यक्तीसोबत मिळून प्रयत्न केले नाहीत तर बिहारचे प्रश्न सुटणार नाहीत. बिहारचे प्रश्न समजणारे, लोकांमध्ये जाऊ काम करणारे लोक, बिहार बदलण्याची इच्छा असणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत, असं प्रशांत किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर यांनी माध्यमांमध्ये राजकीय पक्षाची घोषणा करण्याचा अंदाज व्यक्त केला होता, पण त्यासंदर्भात घोषणा करणार नसल्याचं ते म्हणाले. जर पक्षाची स्थापना केली तर त्यामध्ये सर्वाचं योगदान असेल. २ऑक्टोबर पासून पदयात्रा सुरु करणार आहे. मी वैयक्तिकरित्या ३ हजार किमीची यात्रा करणार असल्याचं ते म्हणाले.
माझं सरकार या महाराष्ट्रात येईल त्या दिवशी… बाळासाहेबांचं गाजलेलं भाषण राज ठाकरेंकडून शेअर