कीव :रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukriane) यांच्यात २४ फेब्रुवारीपासून युद्ध सुरु झालं आहे. रशियाचे रणगाडे (Tanks) आणि लढाऊ वाहनांचं नुकसान झालं आहे. यूक्रेनच्या सैन्यानं रशियाच्या अत्याधुनिक टी-९० म रणगाडा उद्धवस्त केला आहे. रशियासाठी मोस्कवा युद्धनौका नष्ट झाल्यानंतर दुसरा धक्का आहे. रशियासाठी टी-९०म हा रणगाडा महत्त्वाचा मानला जातो. रशियाच्या टी-९० मचं उद्धवस्त होणं भारतीय लष्कराची चिंता वाढवणार ठरु शकतं.

रशियानं टी-९०म ची निर्मिती करताना तो दुश्मनांच्या रणगाड्यांनी हल्ला केला तरी स्वत:चा बचाव करु शकते, अशी प्रणाली विकसित केली होती. त्यामध्ये स्वयंचलित संरक्षण यंत्रणा विकसित केली आहे ज्याद्वारे मिसाईल हल्ला झाल्यास स्मोक ग्रेनेडचा मारा करते. यूक्रेनच्या सैन्यानं एक व्हिडीओ जारी करुन याविषयी माहिती दिली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमधील हिंसाचाराला जबाबदार कोण? शरद पवार म्हणाले…
यूक्रेनमधील कीव इंडिपेंडेंटचे पत्रकार इलिया यांनी एक फोटो शेअर केला आहे. टी-९०चे अवशेष फोटोमध्ये दिसून येत आहे. यूक्रेनेच्या पूर्वोत्तरमधील खारकीवमध्ये ओब्लास्टमध्ये या टँकवर हल्ला करण्यात आला. टी-९०म उद्धवस्त केल्यानं यूक्रेनच्या सैन्याचं मनोबल वाढलं आहे. रशियाच्या सैन्याकडे टी-९०म चे १०० रणगाडे आहेत.

रशियानं टी-१४ अर्माटा रणगाडे अद्याप त्यांच्या सैन्यामध्ये वापरण्यास सुरुवात केलेली नाही. टी-९० चे टी-९० एस रणगाडे जगभरातील देशांना निर्यात केली. भारतीय सैन्यात देखील हजारोंच्या संख्येनं टी-९० रणगाडे आहेत. रशियानं टी-७२ रणगाड्यांचं अद्यावतीकरण करुन टी-९० ची निर्मिती केली होती. यूक्रेननं रशियाचा रणगाडा उद्धवस्त केल्यानं भारतीय सैन्याची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
जल्लोष करण्याची ही कोणती पद्धत? धोनी बाद झाल्यानंतर विराटने दिली…
रशियानं यूक्रेन विरुद्ध नाटोतील सहभागाच्या मुद्यावरुन युद्धाला सुरुवात केली होती. दोन महिन्यांपासून सुरु अलेल्या युद्धात यूक्रेन प्रमाणं रशियाचं देखील नुकसान झालं आहे. रशिया युद्धात होणारं नुकसान कमी करण्यासाठी रोबोटचा वापर करु शकतं. रशियन लष्करी तज्ज्ञ विक्टर मुराखोस्की यांनी रशियन सरकारी माध्यमांना ही माहिती दिली आहे. रशिया शिवाय जगातील कोणत्याही देशानं रोबोटिक्समधील तंत्रज्ञान विकसित केलं नाही.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आम्ही यूक्रेनमध्ये आमचं सैन्य पाठवून तिसऱ्या महायुद्धाचा धोका पत्करणार नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही यूक्रेनला शक्य तितकी मदत करणार असल्याचं बायडन म्हणाले.

आधी कौतुक, नंतर पोस्ट एडिट केली; प्राजक्ता माळीने थेट राज ठाकरेंनाच टॅग केलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here