नवी दिल्लीः रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि शिकागो विद्यापीठात सध्या प्राध्यापक असलेले हे IMFच्या सल्लागार समितीत आहेत. करोना व्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे संकट आले आहे. त्यातून जगाला बाहेर काढण्यासाठी रघुराम राजन हे आपले योगदान देत आहेत. सरकारने करोना महामारीविरोधात मदत मागितील तर भारतात परतण्यास तयार आहे, असं रघुराम राजन यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेच सांगितलं.

जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरू झाली आहे. पण यात पुढच्या वर्षी सुधारणा होण्याची आशा आहे. देशासमोर सध्या विदेशी चलन परताव्याचं मोठं आव्हान आहे. इतर देशांच्या आर्थव्यवस्थेच्या तुलनेत रिझर्व्ह बँकेने उचललेल्या पावलांमुळे देशाचे चलन काहीसे भक्कम स्थितीत आहे. पण डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सतत घसरत आहे. इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे, असं रघुराम राजन म्हणाले.

करोना व्हायरसच्या संकटाच्या काळात सरकारने विरोधी पक्ष आणि सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांना सोबत घेऊन आव्हानांचा सामना केला पाहिजे. स्वातंत्र्यांनंतर देशासमोरचे हे सर्वात मोठे आव्हान आहे, असं राजन यांनी सांगितलं. फक्त PMOच्या मदतीने या संकटाचा सामना करणं अवघड आहे. सरकारला प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत आणि त्यांचा विचार घेणं गरजेचं आहे. फक्त PMOच्या मदतीने आव्हानांचा सामना करण्याचा प्रयत्न केला तर फार उशिर होईल, असा इशारा राजन यांनी दिला.

२००८ मधील मंदी मागणी घटल्याने

२००८-०९मध्ये आलेली मंदी ही मागणी घटल्याने निर्माण झाली होती. त्यावेळी देशातील बहुतेक कंपन्यांची आर्थिक स्थिती बळकट होती. देश वेगाने विकास करत होता. पण सध्याची परिस्थिती वेगळी आहे. आर्थिक स्थितीत विविध पातळ्यांवर मागे पडत असल्याने आव्हान वाढलं आहे, असं रघुराम राजन म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here