मुंबई: बॉलिवूडमधील अभिनेत्री नुसरत भरूचा तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. पण सध्या तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. कारण आहे तिचा आगामी चित्रपट.नुसरतच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘जनहित में जारी‘ असं आहे. हा चित्रपट कंडोमच्या जनजागृतीवर आधारित असून या चित्रपटात नुसरत सेल्सगर्लच्या भूमिकेत आहे.

नुसरत या चित्रपटात कंडोम विकताना आणि त्याबद्दल जागृती करताना दिसणार आहे. या बोल्ड विषयाला चित्रपटात मजेशीर पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आलाय. टीझर पाहून नुसरतला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. नुसरतनं देखील या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिली आहे. तिनं अतिशय वाईट असे कमेंट्स आणि मेसेज यांचे स्क्रिनशॉर्ट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीनं काय शिकवलं? फ्लोरा सैनी म्हणते…

ट्रोलर्सचे हेच स्क्रिनशॉर्ट्स शेअर करत नुसरतनं म्हटलं आहे की, हाच विचार मला बदलायचा आहे. अनेकांनी या टीझरवर अश्लिल प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर नुसरतला ‘डी ग्रेड’ अभिनेत्री म्हटलं आहे. तर एकानं ‘ बॉलिवूड आता मेडिकल झालंय, असं म्हटलंय. अनेकांनी हे सर्व नाटकी वाटत असल्याचं म्हटलं. कोणतीही मुलगी अशा प्रकारे रस्त्यावर कंडोम विकत नाही, असं म्हटलं आहे.


असं असलं तरी अनेकांनी जनहित में जारी चित्रपटाचं प्रचंड कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाचा विषय लक्षात घेऊन हा चित्रपट चांगली कमाई करेन, असं अनेकांनी म्हटलं.ड्र्ग खरेदी करताना विचार करा, कंडोम खरेदी करताना नको, तुम्ही मला नावं ठेवा, पण मी बोलणारंच. कंडोम खरेदी करताना लाजू नका. असं नुसरतनं म्हटलं आहे.
मुलगा की मुलगी! ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमाच्या सीनवर सुरू झाला वाद, न्यायालयात याचिका दाखल
नुसरतचा हा चित्रपट १० जून रोजी प्रदर्शित होणार असून लवकच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here