
स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे, उमेश कामत, शिल्पा तुळसकर असे अनेक चेहरे पुन्हा छोट्या पडद्यावर दिसायला लागले आहेत. त्यात स्टार प्रवाहवर तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून उर्मिला कोठारेही १२ वर्षानंतर मालिकेत काम करत आहे. ही मालिका सुरू होण्याआधी तिचे प्रोमो हिट झाले. मालिकेत मल्हार कामत हा यशस्वी गायक दाखवला आहे. ती भूमिका अभिजीत खांडकेकर करत आहे.
आई कुठे काय करते : संजना करते आत्महत्येचा प्रयत्न, देशमुख कुटुंबात मोठा गहजब
या श्रीमंत, यशस्वी गायकाचं मल्हार कामतचं घर पाहून प्रेक्षक चकित झाले. कारण ते घर होतं येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतल्या ओमचं. त्याचा आलिशान बंगला आता मल्हार कामतचा आहे. प्रेक्षकांनी हे साम्य लगेच ओळखलं.
अनेकदा मालिकांच्या शूटसाठी ठरलेले बंगले असतात. ते मढ, मालाड या परिसरात असतात. एका मालिकेच शूटिंग पूर्ण झालं की ते दुसरीला भाड्यानं देतात. आता येऊ कशी तशी मी नांदायला मालिका संपली आहे. तिथे तुझेच मी गीत गात आहे मालिकेतल्या मल्हार कामतचं शूटिंग सुरू आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेमध्ये उर्मिलानं प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुलीच्या भवितव्यासाठी झगडणारी आई साकारली आहे. या आईची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची आहे. काबाडकष्ट करून ती मुलीला वाढवते आहे. त्यामुळे या पात्राला साजेसा असा उर्मिलाचा लूक आहे.ही भूमिका साकारण्यासाठी उर्मिलानं अतिशय साधी साडी नेसली आहे. इतकंच नाही तर ही भूमिका वास्तववादी वाटावी यासाठी तिनं कोणताही मेकअप केलेला नाही.
अदिती राव हैदरीने घेतली १ कोटींची गाडी, कार कलेक्शनमध्ये देते बड्या स्टार्सना मात
या मालिकेतील वातावरण हे नागपूर परिसरातील दाखवलं आहे. त्यामुळे मालिकेचं चित्रीकरण देखील रणरणत्या उन्हात होत आहे. मात्र या नवीन मालिकेतील ही भूमिका साकारण्यासाठी उर्मिला जे कष्ट घेत आहे, ते नक्कीच कौतुकास्पद आहे.