मुंबई: मुंबईत करोनाबाधीत रुग्णांची संख्या १ हजार १८२ इतकी झाली आहे. आज दिवसभरात करोनाचे १८९ नवीन रुग्ण आढळले असून मुंबईत आणखी ११ जणांचा करोनाने मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा ७५ इतका झाला आहे. आज दिवसभरात आणखी दोन रुग्ण करोनामुक्त झाले असून आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या ७१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईत करोनामुळे आणखी ११ रुग्ण दगावले असून त्यापैकी ८ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे तर अन्य तीन रुग्णांचा मृत्यू ५ ते ९ एप्रिल या कालावधीत झालेला आहे. त्याचा अहवाल उशिरा प्राप्त झाल्याने आजच्या आकडेवारीत त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

मुंबईत आज करोनाचे १८९ नवीन रुग्ण आढळल्याने आतापर्यंत आढळलेल्या एकूण करोनाबाधितांची संख्या ११८२ इतकी झाली आहे. त्यात मृत्यू झालेल्या ७५ रुग्णांचाही समावेश आहे. आज मुंबईतील विविध रुग्णालयांत करोना सदृष्य लक्षणे असलेले २९३ नवीन रुग्ण दाखल झाले असून अशा रुग्णांची संख्या आता ४ हजार ३२८ इतकी झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here