मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं लग्न होऊन तीन आठवडे होत आले आले तरी त्यांच्याविषयीची चर्चा रंगतच आहे. लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओंनी तर चाहत्यांवर भुरळ घातली आहेच, पण लग्नानंतर या जोडीचं आयुष्य कसं सुरू आहे, हे चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. अगदी साध्या पध्दतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधल्यानंतर रणबीर आणि आलियाने त्यांच्या कामालाही सुरुवात केली. लग्नाच्या चौथ्याच दिवशी आलियाने तिच्या नव्या सिनेमाच्या सेटकडे मोर्चा वळवला होता तर रणबीरनेही त्याच्या शूटिंगला सुरुवात केली. पण आता ही जोडी एकत्र नवरा बायको म्हणून अशा खास ठिकाणी गेले की जिथे त्यांच्या विशेष आठवणी आहेत.


पाच वर्षापूर्वी अयान मुखर्जी याने दिग्दर्शक म्हणून ब्रह्मास्त्र या सिनेमाच्या शूटला सुरुवात केली. करोनाच्या संकटामुळे या सिनेमाच्या शूटिंगला वेळ लागला. मात्र काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा शेवटच्या सीनचे शूट पूर्ण झाले. या सिनेमाशी रणबीर आणि आलिया यांचं एक खास असं नातं आहे. रणबीर आणि आलिया हे याच सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

बेस्टफ्रेंडच्या बर्थडेसाठी मंदिरा थायलंडमध्ये, फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. त्यावेळी रणबीर दीपिका पादुकोणसोबतच्या ब्रेकअपमुळे अपसेट होता. अशा वेळी आलियासोबतची मैत्री त्याला आधार देणारी ठरली. या सिनेमाचं शूटिंग करत असतानाच दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं आणि आज ते खऱ्या आयुष्यातही एकत्र आहेत.

आलिया रणबीर

या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला तो ही जोडी जेव्हा नुकतीच ब्रह्मास्त्रच्या सेटवर पोहोचली तेव्हा. या पूर्वी अनेक वेळा रणबीर आणि आलिया हे या सिनेमाच्या सेटवर गेले आहेत. त्यावेळी ते सुरुवातीला एक सहकलाकार म्हणून भेटले. त्यानंतर बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड म्हणूनही ही जोडी ब्रह्मास्त्रच्या सेटवर गेली आहे. पण आता पहिल्यांदाच नवरा-बायको बनून त्यांनी त्याच ठिकाणी हजेरी लावली जिथे त्यांच्या रिलेशनशिपची सुरुवात झाली.

रणबीर कपूर

रणबीर आणि आलियाचं लग्न रणबीरच्या घराच्या बाल्कनीत झालं. तेव्हाही आलिया असं म्हणाली होती की ही तीच जागा आहे जिथे आम्ही तासनतास गप्पा मारायचो. भविष्याविषयी बोलायचो. ब्रह्मास्त्रचा सिनेमाचा सेटही या दोघांसाठी असाच खास आहे.

दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीनं काय शिकवलं? फ्लोरा सैनी म्हणते…

आलिया भट्ट

आलिया सध्या रॉकी और रानी की प्रेमकहानी या सिनेमाचे शूटिंग करत आहे. नुकतंच तिने दिल्ली विमानतळावर या सिनेमाच्या काही सीनचं शूटिंग केलं. या सिनेमात ती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. तर रणबीर कपूर अॅनिमल या सिनेमाचंही शूटिंग करत आहे. दिल्ली एअरपोर्टवरूनच रणबीर आणि आलिया ब्रह्मास्त्रच्या सेटकडे गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here