पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) २ मे ते ४ मे पर्यंत दरम्यान यूरोपच्या दौऱ्यावर होते. नरेंद्र मोदींनी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट दिली. नरेंद्र मोदींनी ४ मे रोजी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आहे. मोदींनी या भेटीत मॅक्रॉन यांच्याशी दोन्ही देशांतील संबंधाविषयी चर्चा केली. दोन्ही देशांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि हिंदी आणि पॅसिफिक महासागरातील चीनच्या बदलत्या रणनीतीला संयुक्तपणे प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील भेटीसंदर्भात संयुक्त प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दोन्ही देश लोकशाही, स्वातंत्र्य, कायद्याचं राज्य आणि मानवधिकारांसाठी कटिबद्ध असल्याचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे.
रशियाला मोठा धक्का, अत्याधुनिक T-90M रणगाडा यूक्रेनकडून उद्ध्वस्त, भारताची चिंता वाढणार?
दोन्ही देशांकडून जारी करण्यात आलेल्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकानुसार हिंदी आणि पॅसिफिक महासागरात शांतता, स्थिरता आणि समृद्धीच्या क्षेत्रात संयुक्तपणे दोन्ही देश राजनैतिक धोरण ठरवतील. भारत आणि फ्रान्सनं हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर हे स्वतंत्र, मु्क्त क्षेत्र असावं, अशी भूमिका मांडली आहे. आंतरराष्ट्रीय कायदे, सार्वभौमत्त्व, प्रादेशकि एकता यांच्यासह संघर्ष मुक्त असावं, असं भारत आणि फ्रान्सनं म्हटलं आहे.

दक्षिण चीन समुद्रावर चीनचा दावा
भारत, अमेरिका आणि इतर देश हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरामधील संपन्न क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाविरोधात भूमिका घेतली आहे. दक्षिण चीन समुद्रावर चीननं दावा केला आहे. मात्र, तैवान, फिलीपाईन्स आणि ब्रुनेई, मलेशिया आणि व्हिएतनाम देखील दक्षिण चीन समुद्राच्या काही भागावर त्यांचा हक्क सांगत आहेत. दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वतीनं एक कृत्रिम बेट स्थापन करण्यात आलं आहे. चीन आणि जपान यांच्यात देखील प्रादेशिक वाद आहेत.

भारत आणि फ्रान्सनं जारी केलेल्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकानुसार दोन्ही देशांनी संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, दळणवळण आणि स्थिरता या मुद्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. भारत आणि फ्रान्सनं हिंदी आणि पॅसिफिक महासागरातील समविचारी देशांशी सहकार्य वाढवण्यावर भरत दिला आहे.
लोकशाही-एकाधिकारशाहीमध्ये लढाई सुरु, तिसऱ्या महायुद्धाविषयी जो बायडन यांचे महत्त्वाचे वक्तव्य
भारत आणि फ्रान्स दहशतवादाचा निषेध करत असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. भारतात आयोजित होणाऱ्या नो मनी नो टेरर या आंतरराष्ट्रीय समेंलनाची तिसऱ्या परिषदेत फ्रान्सनं सहभागी होण्याची इच्छा दर्शवली आहे.

मत मिळवण्यात नाही फक्त सभा घेण्यात राज ठाकरे एक्सपर्ट | रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here